श्री.बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ अंबप,संचलित कॉलेज ऑफ एज्युकेशन(बी.एड) पेठ वडगांव येथे

डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम जयंती,जागतिक विद्यार्थी दिवस व वाचन प्रेरणा दिन"  कार्यक्रमाचे आयोजन केले 


प्रेस मीडिया लाईव्ह :

 श्री.बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ अंबप,संचलित कॉलेज ऑफ एज्युकेशन(बी.एड) पेठ वडगांव येथे आज दिनांक 15/10/2022 रोजी "डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम जयंती,जागतिक विद्यार्थी दिवस व   वाचन प्रेरणा दिन"  कार्यक्रमाचे आयोजन केले होते.या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्र.प्राचार्या.सौ.निर्मळे आर.एल आणि प्रमूख पाहूणे मा.श्री.युवराज कदम,तसेच प्रमुख उपस्थिती मा.श्री.अस्सलम जमादार (नायब तहसिलदार तालुका पन्हाळा) आणि मा. डॉ.आर्शिया शेख उपस्थिती होते.तसेच सौ.मेघा कोलटकर व श्री. मिलिंद कोलटकर उपस्थित होते. 

                    या कार्यक्रमाचे प्रमूख पाहूणे श्री.युवराज कदम यांनी आपले मनोगत व्यक्त केले.त्यांनी “वाचन प्रेरणा दिन” कार्यक्रमाच्या अनुषंगाने वाचनाचे महत्त्व सांगितले.वाचनाचे महत्त्व पटवून देताना त्यांनी डॉक्टर आंबेडकर,यशवंतराव चव्हाण,अण्णा हजारे व अब्दुल कलाम अशा मोठ्या व्यक्तींचे उदाहरण दिले.तसेच प्रमुख उपस्थिती असलेले मा.श्री अस्लम जमादार सरांनी वाचना संबंधीचे महत्व सांगितले. त्यांनी प्रशासकीय कामकाजाबद्दल देखील कॉलेजच्या छात्राध्यापकांना मार्गदर्शन केले. तसेच डॉ.आर्शिया शेख यांनीही वाचनाचे जीवनातील महत्व सांगितले.

              आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्रभारी.प्राचार्य.सौ.निर्मळे आर्.एल मॅडम यांनी मनुष्याच्या आयुष्यातील वाचनाचे महत्त्व सांगताना त्या म्हणाले की आपण पुस्तक वाचतो तसेच आपल्याला माणसांनाही वाचता आले पाहिजे याचे उदाहरणासहित महत्त्व त्यांनीं सांगितले व आजच्या ऑनलाइन जगात पुस्तक हे खऱ्या मित्रासारखे कसे आपली मदत करतात हे सांगितले. कार्यक्रमाच्या वेळी महाविद्यालयाच्या प्राध्यापक श्री सोरटे एस के, सौ शिरतोडे व्ही एल, प्रा.कु.मुजावर एस.ए आणि प्रा. सावंत ए.पी. व  छात्राध्यापक व कर्मचारी वर्ग उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  छात्राध्यापिका वृषाली मुंडे   यांनी केले.तसेच प्रास्ताविक छात्राध्यापिका सुजाता कुंभार यांनी केले. छात्राध्यापक विनायक पाटील यांनी आभार प्रदर्शन केले.

Post a Comment

Previous Post Next Post