सखाराम जाधव यांचा "कलाभुषण सन्मान" पुरस्कार देऊन गौरविण्यात आलेप्रेस मीडिया लाईव्ह :

इचलकरंजी :: शिरदवाड ता. शिरोळ येथील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते व कलाकार ग्रामदेवताचे संपादक तथा बहुजन प्रेस क्लबचे जिल्हा अध्यक्ष - मा. सखाराम नरहरी जाधव यांना बळीराजा कृषी  विज्ञान मंडळ तारदाळ यांचेवतीने "कलाभुषण" सन्मान पुरस्कार देवून गौरव करण्यात आला.

यावेळी लोकक्रांती विकास आघाडीचे राज्याध्यक्ष- मा. दत्ता मांजरे, तारदाळकर; उपाध्यक्ष-मा. नागेश क्यादगी; जिल्हाध्यक्ष मा. अशोक ठोमके; जादुगार - स्टार विलास; हास्य कलाकार - राजू शेख; कवि- साताप्पा सुतार; पत्रकार- शिवाजी येडवान; मार्था भोसले;अभिनेता- रत्नकांत चौगुले; अभिनेत्री मनिषा चौगुले; गायिका- सिमा भंडारे आदि प्रमुख मान्यवर उपस्थित होते.


Post a Comment

Previous Post Next Post