मुस्तफा मुख्तार खान या लहान मुलाचा अनोखा वाढदिवस साजरा

 भोळसर तथा बेवारस लोकांचे दाढी कटिंग आंघोळ स्वच्छ करीत केले वाढदिवस साजरा


प्रेस मीडिया लाईव्ह :

औरंगाबाद (अब्दुल कय्यूम  ) : 

 भडकलगेट येथील समाजसेवक तथा राष्ट्रावादी काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष मुख्तार खान यांचे मुस्तफा खान या लहान  मुलाचा वाढदिवस आगळ्यावेळ्या पध्दतीने साजरा केला भोवळसर तथा बेवारस व्यक्तीचा शोध घेऊन त्यांची भेट घेऊन तसेच त्यांची समजूत काढून टाऊनहॉल येथील कार्यालयात आणून त्यांची दाढी,कटिंग तसेच आघोळघालून स्वच्छ करून नविन कपडे घालून भोवळसर बेवारस लोकांना चांगले करून त्यांना त्यांच्या ठिकाणी आणून सोडले आहे.

मुख्तार यांच्या लहान मुलगा मुस्तफाखान याचा आज वाढदिवस होता मुख्तार खान यांनी वाढदिवस साजरा बाहेर कुठेही ना जाता गोरगरीब लोकांच्या सोबत साजरा करण्याचा निर्माण घेतला होता. 

भोवळसर,बेवारस लोकांना रेल्वेस्टेशन तसेच घाटी परिसरात शोधून त्यांना आपल्या कार्यालयात आणून स्वच्छ करून तसेच त्यांच्या सोबत बसून भोळसर व्यक्ती सोबत मुख्तार खान बब्बू भाई यांनी त्यांच्या थाळीत जेवण केले आहे. आपल्या मुस्ताफा मुख्तार खान याचा आनंदाने वाढदिवस साजरा केला आहे. कोणाचा वाढदिवस साजरा करत आहे.तर अशाच लोका सोबत वाढदिवस साजरा करावे असे मुख्तार खान यांनी सुचविले आहे.

मुख्तार खान यांना समाजसेवक सुमित पंडीत यांची साथ लाभली तसेच मुख्तार खान बब्बू, शेख कय्यूम अहेमद,किशोर वाघमारे,मुसा खान,रहमत खान, नदीम कुरेशी आदींची सहकार्य  लाभले आहे.यावेळी सय्यद साबेर भाई तसेच वार्डातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कुठेही बेवारस तसेच भोळसर व्यक्ती यांची मी मदत करणार व यापुढे असेच उपक्रम आम्ही राबवणार असे मुख्तार खान बब्बू भाई यांनी वेळी सांगितले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post