श्रीमंत आबासाहेब घोरपडे यांना चौथ्या स्मृतिदिनी प्रबोधिनीत अभिवादन



प्रेस मीडिया लाईव्ह :

इचलकरंजी ता. १६ ,इचलकरंजीच्या जहागीरदार घोरपडे घराण्याला तीनशे वर्षाहुन दीर्घ काळचा लोकसेवेचा संपन्न इतिहास आहे. जहागीरदार श्रीमंत गोविंदराव उर्फ आबासाहेब घोरपडे हे अतिशय दानशूर,निर्मोही व राजस व्यक्तिमत्व होते.त्यांनी अनेक दवाखाने,शिक्षण संस्था,सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थाना ,उपक्रमांना तसेच राष्ट्रीय आपत्तीच्या काळात सातत्यपूर्ण मदत केली होती.

समाजवादी प्रबोधिनीच्या लोकप्रबोधन कार्यालाही त्यांनी मदत केली. इचलकरंजी आणि परिसराच्या सहकार ते शिक्षण अशा सर्वांगीण जडणघडणीत घोरपडे राजघराण्याचे मौलिक स्वरूपाचे योगदान आहे.ती दूरदृष्टी घेऊन श्रीमंत आबासाहेब सहा - सात दशके कार्यरत राहिले.लोकसेवेचा तोच वसा व वारसा त्यांचे सुपुत्र श्रीमंत यशवंतराव घोरपडे पुढे नेत आहेत असे मत समाजवादी प्रबोधिनीचे सरचिटणीस प्रसाद कुलकर्णी यांनी व्यक्त केले. 

प्रारंभी श्रीमंत गोविंदराव उर्फ आबासाहेब घोरपडे यांच्या चौथ्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या  प्रतिमेला इचलकरंजी इंडस्ट्रीयल इस्टेटचे चेअरमन राहुल खंजिरे यांच्या हस्ते

पुष्पहार अर्पण करण्यात आला. समाजवादी प्रबोधिनीत झालेल्या या कार्यक्रमाला प्रसाद कुलकर्णी, राहुल खंजिरे, दयानंद लिपारे, डी.एस.डोणे,पांडुरंग पिसे,तुकाराम अपराध,महालिंग कोळेकर,नारायण लोटके,मनोहर जोशी,अशोक माने, सत्वशील हळदकर, आनंदा हावळ, आनंद जाधव इत्यादी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post