गुन्हे शाखेची कामगिरी -पो. ठाणे पुंडलिकनगर हद्दीत झालेल्या घरफोडी गुन्हे शाखेकडुन दोन दिवसात उघडकीस

  गुन्ह्यातील सोने-चांदीसह एकुण 2,15,000/- रुपयेचा मुद्देमाल हस्तगत केले आहे.


प्रेस मीडिया लाईव्ह :

औरंगाबाद  (अब्दुल कय्यूम ) :

-पो. ठाणे पुंडलिकनगर हद्दीत झालेल्या घरफोडी गुन्हे शाखेकडुन दोन दिवसात उघडकीस व गुन्ह्यातील सोने-चांदीसह एकुण 2,15,000/- रुपयेचा मुद्देमाल हस्तगत केले आहे.

 दिनांक 14/10/2022 रोजी गुन्हे शाखेच्या पोलीस उप निरीक्षक अजित दगडखैर यांचे पथकाला गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, पुंडलिकनगर हदीमध्ये धरफोडीतील आरोपी हे सध्या भारतनगर व आनंदनगर परिसरात आहेत. माहिती मिळाल्यानंतर तात्काळ पथकासह सदर ठिकाणी पोहचून संपूर्ण परिसरात बातमीदारांचे जाळे पेरुन, संपुर्ण परिसर पिंजुन काढुन, भारतनगर येथील त्यांचे धर निष्पन्न करुन घरात सुलताना मुबारक शेख, ही मिळुन आली तिला तिच्या दोन्ही मुले यांचे बाबत विचारपुस करता तिने ते घरातच असल्याचे सांगितले, तेव्हा त्यांना बाहेर बोलावले व पंचांसमक्ष त्यांना त्यांचे नाव गाव विचारता दोन्ही विधी संघर्षग्रस्त बालके यांना त्यांचे आई समक्ष देवगिरी हिल्स, शिवाजीनगर येथे झालेल्या चोरी बाबत विचारपुस करता त्यांनी सुरवातीस उडवाउडवीचे उत्तरे दिली परंतु त्यांना अधिक विश्वासात घेऊन विचारपुस करता त्यांनी त्यांचे घराचे जवळच चार पाच दिवसांपहिले देवगिरी व्हॅली, शिवाजीनगर येथे घराचे कुलूप तोडुन एलईडी टिव्ही, सोने चांदीचे दागिणे, रोख रक्कम असे चोरल्याची कबुली देऊन एलईडी टिव्ही व दागिणे घरातच लपवून ठेवले असल्याचे व रोख रक्कम हे खर्च केले असल्याचे सांगितले तेव्हा दोन पंच व दोन्ही विधी संघर्षग्रस्त बालकांचे आई समक्ष त्यांचे राहते घराची झडती घेऊन गुन्हयातील चोरीस गेलेला एकुण 2,15,000/- रुपयेचा मुद्देमाल जप्त करुन पो ठाणे पुंडलिकनगर, औरंगाबाद शहर गुरनं 429/2022 कलम 454,457,380 भादवि हा गुन्हा उघडकीस आणला दरम्यान दोन्ही विधी संघर्षग्रस्त बालकांनी चोरी करतांना गजाननगर, गारखेडा परिसर, औरंगाबाद येथुन चोरलेली शाईन कंपनीची मोटरसायकल वापरली होती. ती पुंडलिकनगर येथील मळयामध्ये जाऊन जाळलो त्यावरून पो टाणे पुंडलिकनगर गुरनं 399/2022 कलम 379 भादवि सुध्दा गुन्हा उघडकीस आणुन दोन्ही विधी संघर्ष बालके असल्याने त्यांचे आई-वडीलांना पोलीस ठाणे पुंडलिकनगर येथे हजर राहण्याचे सांगुण मुद्देमालासह विधी संघर्ष बालकांना पोलीस ठाणे येथे हजर करुन घरफोडीचा गुन्हा तसेच माहे सप्टेंबर मध्ये चोरीस गेलेल्या मोटरसायकल चोरीचा एक असे दोन गुन्हे उघडकीस आणले आहेत. सदरची कामगिरी  मा. पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्ता, मा. पोलीस उप आयुक्त अपर्णा गिते यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.

 मा. पोलीस निरीक्षक गुन्हे अविनाश आघाव, पोलीस उप निरीक्षक अजित दगडखैर, सफौ रमाकांत पटारे,संदीप तायडे, संजय नंद,सुनिल बेलकर, संदीप राशिनकर, अजय दहिवाळ, विजय घुगे, धनंजय सानप, महिला अंमलदार गीता ढाकणे यांनी केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post