महालक्ष्मी चॅरिटेबल सोसायटी कडून जानकी वृद्धाश्रमास रूग्णवाहीका भेट


प्रेस मीडिया लाईव्ह :

नामदेव निर्मळे :

         कुरूंदवाड येथील लक्ष्मी बेकरीचे उद्योजक राजन पुदुशेरी यांनी समाजातील व्यक्तींना आपल्या कडून मदत करता यावे या उदारहेतूने कुरूंदवाड येथे श्री.महालक्ष्मी चॅरिटेबल सोसायटी नोंदणी करून संस्थेमार्फत रूग्णवाहीका व शववाहीका अत्यल्प दरात सेवा चालू केली.यासेवेमुळे कुरूंदवाड व परिसरातील  अनेक रुग्णांना जीवदान मिळाले आहे.अलिकडे कुरूंदवाड नगरपरिषदेने स्वतःचे रुग्णवाहिका सेवा चालू केल्याने ट्रस्टचे रुग्णवाहिका बंद अवस्थेत होते.राजन पुदुशेरी यांच्या दुरदुष्ठी कल्पनेतून आपल्या ट्रस्टच्या संचालकांना विश्वासात घेऊन रूग्णावाहीका घोसरवाड येथील जानकी वृध्दाश्रमास भेट देण्याचा निर्णय घेतला.त्यानुसार गुरूवारी २२ रोजी जानकी वृद्धाश्रम येथे रुग्णवाहिका मान्यवरांच्या उपस्थितीत देण्यात आला.यावेळी  जानकी वृद्धाश्रमचे अध्यक्ष बाबासाहेब पुजारी यांनी महालक्ष्मी चॅरिटेबल सोसायटी अध्यक्ष-राजन पुदुशेरी, विश्वस्त ॲड.विजय जमदग्नी, सुभाष भबिरे, वृद्धाश्रम चे माजी अध्यक्ष डॉ.राजेंद्र जाधव (कुरूंदवाड), माजी उपाध्यक्ष- मोहन खोत , सल्लागार संचालक रमेशकुमार मिठारे (अकिवाट) यांची   महाराष्ट्र राज्य पतसंस्था कर्मचारी संघटनेचे उपाध्यक्ष पदी  निवड झाल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला.यावेळी घोसरवाडचे ग्रामपंचायत सदस्य राकेश कागले, माजी तंटामुक्त अध्यक्ष -जुगळे सर, पत्रकार-गणपती कोळी ,शिवाजी भोसले,सुरज भोसले, सुभाष कांबळे,बंटी कांबळे व आश्रमातील वयोवृद्ध , महिला माता,भगिनी बहुसंख्येने  उपस्थित होते.या रुग्णवाहिकेमुळे जानकी वृद्धाश्रम व परिसरातील नागरिकांना याचा लाभ मिळणार आहे.असे जानकी वृद्धाश्रमातील वृद्ध - माता पित्यातुन समाधान व्यक्त होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post