कोल्हापूरची अक्षरा पोवार पुण्यात आदर्श विद्यार्थी पुरस्काराने सन्मानित


प्रेस मीडिया लाईव्ह :

टाकळीवाडी:- नामदेव निर्मळे

सदाशिव पेठेतील भारत इतिहास संशोधक मंडळात राजमुद्रा प्रिंट व सीना स्टार द्वारा संयुक्त विद्यमाने आयोजित शिक्षक व विद्यार्थी सन्मान सोहळा कार्यक्रमात शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शिक्षक व विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.

   शैक्षणिक अभ्यासाबरोबरच एम. एक्स. टाइम व सीना स्टार द्वारा आयोजित भाषण, डान्स, रांगोळी, शैक्षणिक अभ्यासावर आधारित विविध स्पर्धांमध्ये अक्षरा पोवार हिने राज्यस्तरावर अनेकदा क्रमांक प्राप्त केले होते. पुणे मनपाच्या उपक्रमशील शिक्षिका निलम गायकवाड यांच्या राजमुद्रा प्रिंट कडून महाराष्ट्रात प्रसिद्ध होत असलेल्या 'इंग्लिश लर्नेक्स' या पुस्तकाच्या मुखपृष्ठ प्रसिद्धीचे काम कोल्हापूर प्रतिनिधी म्हणून अक्षराने यशस्वीरित्या केले होते.

   ती चे स्वप्न या पुस्तकाच्या लेखिका तसेच मुख्याध्यापिका माधवी चिंबळकर यांच्या हस्ते राज्यस्तरीय सीना स्टार आदर्श विद्यार्थी पुरस्काराने अक्षरा पोवार हिला गौरविण्यात आले. सीना स्टारचे संस्थापक अमोल निकाळजे, राजमुद्रा प्रिंट विद्यार्थी ग्रुपच्या अध्यक्ष मृण्मयी वीरकर, पुणे जिल्हाध्यक्ष दुर्वा बिडवे यांनी अक्षराचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

   यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष रामप्रसाद डोईफोडे, प्रमुख पाहुणे वंदना मदगे, आकांक्षा वीरकर, निहारिका वीरकर, निर्मला कोळी, राजनंदिनी कांबळे तसेच विविध प्रशालेतील शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post