ग्रामपंचायतच्या पंचवार्षिक निवडणुकीचा निकालात 46 ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे वर्चस्वप्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे जिल्ह्याच्या उत्तर भागात एकूण 61 ग्रामपंचायतच्या पंचवार्षिक निवडणुकीचा आज निकाल लागला या निकालात 46 ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे वर्चस्व आल्याचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी सांगितले.

गारटकर म्हणाले, पुणे जिल्ह्यातील उत्तर भागात जुन्नर तालुक्‍यातील एकूण 36 ग्रामपंचायतींपैकी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या 26 ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीचे वर्चस्व प्रस्थापित झाले आहे. तर आंबेगाव तालुक्‍यातील एकूण 18 पैकी 14 ग्रामपंचायत या राष्ट्रवादीच्या विचाराच्या आल्या आहेत. तसेच खेड तालुक्‍यात पाच ग्रामपंचायतींपैकी चार ग्रामपंचायती व भोर तालुक्‍यातील दोन पैकी दोन्हीही राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या विचाराच्या आलेल्या आहेत.

पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, राज्याचे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, आमदार अतुल बेनके, आमदार दिलीप मोहिते, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजीत शिवतारे, विक्रम खुटवड यांच्या विचाराने विकास कामाच्या जोरावर ग्रामीण भागापर्यंत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा अजेंडा ग्रामपंचायतने ग्रामपंचायतीच्या निकालातून दिसून येत आहे. या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावांचा सर्वागीण विकास करण्यासाठी राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष सर्वोतोपरी मदत करणार असल्याचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी सांगितले.

खेड तालुक्‍यातील पाच पैकी चार ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसने सत्ता मिळवली आहे. आगामी पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या पूर्व तयारीत मतदारांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या बाजूने कौल दिला आहे. तर शिवसेनेला एका ग्रामपंचायतीवर भगवा फडकवण्यात यश आले.

खेड तालुक्‍यात पाच पैकी एक ग्रामपंचायत बिनविरोध झाली होती. 4 ग्रामपंचायतीसाठी लोकनियुक्त सरपंच व सदस्यांसाठी काही जागांसाठी अटीतटीची लढत झाली. रविवारी मतदान झाले होते. सोमवारी (दि. 19) मतमोजणी झाली.निवडणुकीचे निकाल दुपारी बारावाजेपर्यंत जाहीर झाले. मतमोजणी नंतर गुलाल भंडाऱ्याची उधळण करीत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी खेड पंचायत समितीपुढे जोरदार शक्तिप्रदर्शन केले. माघारीच्या वेळी दरकवाडी ग्रामपंचायतीची सरपंचासह, सदस्य निवडणूक बिनविरोध निवड झाली होती तर, चिखलगाव, रोहकल, कहू आणि कोयाळी खरपुड अशा चार गावांच्या निवडणुकीसाठी मतदान झाले होते.

या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शोभा बाळासाहेब गोपाळे या बहुमताने निवडून आल्या. त्यांनी भाजपच्या मीरा रामदास मुके यांच्या पराभव केला. शोभा गोपाळे या पहिल्या गावातील लोकनियुक्त सरपंच आहेत तर त्यांचे पतीराज बाळासाहेब गोपाळे हे दोन वेळा सरपंच होते.

चिखलगाव :लोकनियुक्त सरपंच – शोभा बाळासाहेब गोपाळे : सदस्य : उर्मिला विठ्ठल बांगर, रेश्‍मा मंगेश गायकवाड (दोघी बिनविरोध), प्रभाग 1 : दिगंबर गुरव, प्रमिला गोपाळे. प्रभाग 2 : शैला लोखंडे, दिलीप घोंगे, प्रभाग 3 : एका जागेसाठी धोडींभाऊ ऊर्फ धोंडु डामसे.

Post a Comment

Previous Post Next Post