महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाच्या माध्यमातून आझम कॅम्पस येथे एक महत्त्वपूर्ण परिषदेचे आयोजन

त्या अंतर्गत चर्चा वारंवार घडण्याची गरज आहे.. पी.ए.इनामदार 


प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे : राष्ट्रीय शिक्षण धोरण जाहीर झाल्यापासून त्या अंतर्गत असणारी माहिती सर्वसामान्य शिक्षक, विद्यार्थी आणि शिक्षण क्षेत्रातील सर्वच घटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अनेक स्तरावर उपक्रम सुरू आहेत. त्यातच महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाच्या माध्यमातून आझम कॅम्पस येथे एक महत्त्वपूर्ण परिषदेचे आयोजन केले आहे.


या परिषदे मध्ये माजी सनदी अधिकारी लक्ष्मीकांत देशमुख, उच्च शिक्षणाचे संचालक धनराज माने आणि एम सी ई सोसायटीचे अध्यक्ष पी. ए. इनामदार सहभागी होणार आहेत.खा. सुप्रिया सुळे आणि विजय गव्हाणे यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जाहीर झाल्यानंतर या अंतर्गत नेमक्या कशा पद्धतीने पुढील शैक्षणिक वाटचाल होणार आहे, हे सध्या मोठे आव्हान आहे. त्याची सखोल माहिती शैक्षणिक घटकांपर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे. त्यामुळे धोरण जरी जाहीर झाले असले, तरी त्या अंतर्गत चर्चा वारंवार घडण्याची गरज आहे, असे पी.ए.इनामदार यांनी सांगितले.

डॉक्टर ए आर शेख असेम्बली हॉल आझम कॅम्पस येथे बुधवार, ७ सप्टेंबर रोजी सकाळी ९ ते १ वाजेपर्यंत ही परिषद होणार असून यामध्ये हे धोरण सखोलतेने चर्चिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post