पुणे शहर पोलीस दलांतील पोलीस निरीक्षक सौ. स्वाती देसाई यांचे निधन

पुणे शहर पोलीस दलामधून हळहळ व्यक्त केली जात आहे. 


प्रेस मीडिया लाईव्ह :

 जब्बार मुलाणी :       

पुणे शहर पोलीस दलातील कर्तव्य आणि कार्यक्षम गेले 25 वर्ष पोलीस प्रशासन खात्यांमध्ये त्यांनी आपली उत्कृष्ट आणि कार्यक्षम कर्तव्यदक्ष पुणे शहर पोलीस दलांमध्ये सेवा पार पाडली. सौ. स्वाती देसाई यांनी विविध पोलीस ठाण्यांमध्ये काम पाहिले. पुणे शहर पोलीस दलामध्ये पी डब्ल्यू पुणे शहर सहकारनगर पोलीस ठाणे, विशेष शाखा पुणे शहर अशा पोलीस ठाण्यांमध्ये त्यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली होती. सौ. स्वाती देसाई यांचे सोमवारी दुपारच्या सुमारांस दुःखांमध्ये निधन झाले. त्यांच्या अचानक जाण्यांमुळे देसाई कुटुंबावर दुःखांचा डोंगर कोसळला तसेच पुणे शहर पोलीस दलामधून हळहळ व्यक्त केली जात आहे. 

सौ. स्वाती देसाई यांच्या निधनांची बातमी सोशल मीडियावर समजतात अनेक वरिष्ठांनी देसाई कुटुंबांच्या पुण्यांतील बिबेवाडी येथील त्यांच्या निवासस्थानी धाव घेतली. देसाई कुटुंबाचे सांत्वन केले. तसेच सातारा जिल्ह्यांचे पत्रकार श्री. पुरीगोसावी यांचा सो स्वाती देसाई मॅडम सहकारनगर पुणे शहर पोलीस ठाण्यांचा पदभार घेतल्यापासून चांगलाच परिचय होता. स्वतः पत्रकार श्री. पुरीगोसावी यांनी सौ. स्वाती देसाई मॅडम यांच्या मोबाईल वरचा स्टेटस पाहून श्री. पुरीगोसावी यांच्या पायाखाली वाळूज सरली. व ते एकदमच भावुक झाले. त्यांनी तातडीने सौ.स्वाती देसाई यांचा मुलाशी संपर्क साधत बारामती टाईम्सचे सातारा प्रतिनिधी श्री. पुरीगोसावी यांनी देसाई कुटुंबियांचे सांत्वन केले. यावेळी श्री. पुरीगोसावी यांच्या डोळ्यांमध्ये अश्रूं उभे राहिले यावेळी पुरीगोसावी पुढे म्हणाले... जो आवडे देवाला, तोची आवडे सर्वांना असे म्हणत ईश्वरचरणी प्रार्थना करीत देसाई कुटुंबाला या दुःखांतून सावरण्यांचे बळ देऊ अशा शब्दांत पुरीगोसावी यांनी श्रद्धांजली वाहिली.

Post a Comment

Previous Post Next Post