पुणे शहर पोलीस आयुक्तालयाकडुन आवाहन


प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे शहर व परिसरातील नागरीकांना पुणे शहर पोलीस प्रशासनाचे वतीने सुचित करण्यात येते की, मागील काही दिवसांपासुन लहान मुले पळविणारी टोळी सक्रीय झाल्याबाबत फेसबुक, व्हाट्सअप, ऑडीओ / व्हिडीओ क्लिप, फोटो वायरल होत आहेत, त्यामुळे जनमाणसांत व विशेषतः पालकां मध्ये भितीचे व चिंतेचे वातावरण पसरत आहे.तसेच मागील दोन दिवसापासुन सोशल मिडीयावर काही विद्यार्थ्यांचे फोटो व्हायरल केले जात असुन त्यांना शाळेतुन पळवुन / अपहरण करून नेले आहे अशा

अफवा पसरविल्या जात आहेत. परंतु यात कोणत्याही प्रकारचे तथ्य नसुन, अशाप्रकारची कोणती घटना पुणे शहरात घडलेली नाही, तरी पालकांनी अशा प्रकारच्याअफवांवरती विश्वास ठेवु नये. असा प्रकार आपल्या निदर्शनास आल्यास तात्काळ पोलीस नियंत्रण कक्ष किंवा संबंधित पोलीस ठाण्यास संपर्क साधुन घटनेबाबत शहनिशा करून घ्यावी असे आवाहन पुणे शहर पोलीसांतर्फे करण्यात येत आहे.तसेच अशा प्रकारची माहिती अथवा संदेश मिळाल्यास नागरीकांनी पुर्ण खात्री केल्याशिवाय ते प्रसारीत करू नयेत. अशा प्रकारच्या खोटया माहितीव्दारे अफवा पसरविणारे नागरींकांविरूध्द योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

Post a Comment

Previous Post Next Post