पॉप्युलर फ्रंट जिंदाबाद, पीएफआय जिंदाबाद' अशा घोषणा देण्यात येत होत्या .. असा दावा पुणे पोलिसांनी केला आहे.

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे : शुक्रवारी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पॉपुलर फ्रंट ऑफ इंडिया संघटनेच्या समर्थकांनी आंदोलन केले होते.या आंदोलनावेळी आंदोलकांनी 'पाकिस्तान जिंदाबाद' घोषणा दिल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यावेळी आंदोलकांनी 'पाकिस्तान जिंदाबाद' अशा कोणत्याही घोषणा दिल्या नाहीत. 

आंदोलकांकडून या वेळी 'पॉप्युलर फ्रंट जिंदाबाद, पीएफआय जिंदाबाद' अशा घोषणा यावेळी देण्यात येत होत्या, असा दावा पुणे पोलिसांनी केला आहे. आंदोलकांवर बेकायदेशीर जमाव जमविल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पुणे पोलिसांनी दिली. तर रिजाज जैनुद्दीन सय्यद (वय 26, शिवनेरी नगर कोंढवा खुर्द) याच्यासह जवळपास 40 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भादवी 141 143 145 147 149 188 341 सह मपोका 37/1/3 सह 135 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बंडगार्डन पोलीसांचा माहिती-

काल (सोमवारी) पुणे शहरात पॉपुलर फ्रंट ऑफ इंडिया संघटनेच्या समर्थकांना आंदोलन करण्याची परवानगी नाकारली होती. तरीही या संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेकायदेशीर जमाव जमवला होता. त्यावेळी पोलिसांनी तत्काळ 41 आंदोलकांना ताब्यात घेतले होते. त्यानंतर आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबद्दलचा अधिक तपास बनगार्डन पोलिस करत असल्याची माहिती बंडगार्डन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांची प्रतिक्रिया दिली.

Post a Comment

Previous Post Next Post