पालकांनी अफवांवर विश्‍वास ठेऊ नये...पुणे पोलिसांनी केले आवाहनप्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे : शाळांमधून मुलांना पळवून नेले आहे. या वर्णनाची मुले दिसल्यास या नंबरवर कळवा' असा आशयाचे मेसेज सोशल मीडियावर फिरत आहेत. यामुळे पालक घाबरलेले आहेत. मात्र, अशा प्रकारची कोणतीही घटना घडली नसून, सर्व शाळांमध्ये चौकशी केली आहे.त्यामुळे पालकांनी अफवांवर विश्‍वास ठेऊ नये,’ असे आवाहन पुणे पोलिसांनी केले आहे.

सोशल मीडियावर वेळोवेळी “लहान मुले पळवणारी टोळी सक्रीय’, “या भागातून मुलांना पळवून नेले’, “मुले पळवणाऱ्या टोळीतील या महिला आहेत,’ असे विविध चित्र, मेसेज फिरत असतात. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरते. मात्र, ही अफवा असल्याचे समोर आले आहे. मागील दोन दिवसांपासून वानवडी, कोंढवा परिसराच्या शाळेतील मुलांना पळवून नेल्याचे मेसेज फिरत आहेत. त्यामुळे पालकांमध्ये भीती निर्माण झाली. या मेसेजनंतर पोलिसांनी परिसरातील सर्व शाळांमध्ये चौकशी करून माहिती घेतली असता, कोणालाही पळवून नेले नसल्याचे समोर आले.

सोशल मीडियावरील अफवांवर पालकांनी विश्‍वास ठेऊ नये. त्याचबरोबर आपल्या मुलांना अज्ञात व्यक्तींशी बोलणे, त्यांच्याकडून वस्तू घेऊ नये असे सांगावे. जेणेकरून अशा घटना घडणार नाहीत.
– नम्रता पाटील, (पोलीस उपायुक्त, परिमंडळ 5)

Post a Comment

Previous Post Next Post