बोगस कामगारांची नोंदणी रद्द करणेत येऊन चुकीची व खोटी कागदपत्रे सादर केले बाबत बोगस कामगारांवार कारवाई करावी. अन्यथा...

सहाय्यक कामगार आयुक्त यांचे दारात बेमुदत ठिय्या आंदोलन करणेचा इशारा महाराट्र राज्य असघंटीत ( क्षेत्र )कामगार संघटनेने दिला आहे.


प्रेस मीडिया लाईव्ह :

कोल्हापूर :  आज दिनांक 12/09/2022 ई रोजी सहाय्यक कामगार आयुक्त यांचेशी महाराट्र राज्य असघंटीत ( क्षेत्र )कामगार संघटना  संस्थापक अध्यक्ष श्री अंजुम देसाई (भाई )यांचे सोबत  झाले साग्र चर्चेनुसार कोल्हापूर जिल्यातील बांधकाम कामगार यांची यादी सदोष असून बोगस व चुकीच्या नोंद असलेल्या कामगारांना अनुदान देत असलेबाबत तक्रार नोंदविणेत आलेली आहे. तसेच नोंदणी झालेल्या बोगस कामगारांची नोंदणी रद्द करणेत येऊन चुकीची व खोटी कागदपत्रे सादर केले बाबत बोगस कामगारांवार कारवाई करणेबाबत सूचित करणेत आले. तसेच संबंधित बांधकाम कामगार यांचेवर विहित मुदतीत कारवाई न झालेस  आठ दिवसानंतर दिनांक 21/09/2022 रोजी सहाय्यक कामगार आयुक्त यांचे दारात संघटने मार्फत बेमुदत ठिय्या आंदोलन करणेचा इशारा देणेत आला.  

निवेदन देतेवेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री अंजुम देसाई (भाई )व अन्य सदस्य श्री. इरफान कुरणे, श्री बाळासाहेब कांबळे, श्री. प्रवीण बनसोडे, श्री. प्रशांत कांबळे. डॉ. युवराज शिंदे, श्री. मोहसीन पोवाळे, श्री. नीलकंठ कालेकर व  शिरीष शिंदे उपस्तित होते

Post a Comment

Previous Post Next Post