नेत्यांकडून झालेली बंडखोरी अजूनही शिवसैनिकांना रुचलेली नाही.

धैर्यशील माने यांनी पुन्हा एकदा कमेंट सेक्शन बंद केला आहे. 

प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवेसेनेला खिंडार पाडल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातही त्याचे पडसाद उमटले. आमदार प्रकाश आबिटकर, राजेंद्र पाटील यड्रावकर, राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष माजी आमदार राजेश क्षीरसागर तसेच खासदार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांनी बंडखोरी करत शिंदे गटात सामील झाले.

मात्र, नेत्यांकडून झालेली बंडखोरी अजूनही शिवसैनिकांना रुचलेली नाही. बंडखोरांना सोशल मीडियासह सभे मध्येही त्याचा सामना करावा लागत आहे. आता या यादीमध्ये धैर्यशील माने यांचीही भर पडली आहे. काल केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे कोल्हापूर दौऱ्यावर होते. या दौऱ्यावेळी कोल्हापूर विमानतळा संदर्भात बैठक पार पडली.

या बैठकीसाठी धैर्यशील माने यांचीही उपस्थिती होती. बैठकीनंतर त्यांनी सोशल मीडियातून पोस्ट करत माहिती दिली. त्यांनी माहिती देतानाच बंडखोरी केल्यापासून बंद असलेला कमेंट सेक्शन बंद असलेला सुरु केला. मात्र, त्या पोस्टवरून कौतुक किंवा समर्थन होण्याऐवजी त्यांचे सडकून ट्रोलिंग झाले. त्याचबरोबर पोस्टवर हसणारेही वाढत चालले होते.ट्रोल करत शिवसैनिकांनी चांगलाच समाचार घेतल्याने अखेर धैर्यशील माने यांनी पुन्हा एकदा कमेंट सेक्शन बंद केला आहे. त्यामुळे त्याची पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे. गद्दार, आता माजी खासदार, परत येणार नाही, अतिशय लहान वयात राजकीय आत्महत्या केली, कार्यकर्ते हा शब्द विसरून जावा #माजी खासदार साहेब, सर्व कमेंट्स वाचा आणि आताच राजकीय संन्यास घेण्याची मानसिकता करून ठेवा, अशा शब्दांमध्ये त्यांना ट्रोल करण्यात आले होते.


Post a Comment

Previous Post Next Post