गुन्हे शाखे कडुन पुणे शहरात विशेष मोहिम राबवुन कोटपा अॅक्ट प्रमाणे कडक कारवाई करण्याचा इशारा.

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

 जब्बार मुलाणी

पुणे शहराचे मा. पोलीस आयुक्त श्री अमिताभ गुप्ता .. पोलीस सह आयुक्त श्री. संदिप कर्णिक , गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त श्री. रामनाथ पोकळे , पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे .. यांनी पुणे शहरातील शाळा, महाविद्यालयाचे परिसरात बेकायदेशिररित्या विक्री होणारे वैधानिक ईशारा नसलेले तंबाखु जन्य पदार्थ तंबाखु जन्य हुक्का पार्लर, बंदी असलेले तंबाखुजन्य पदार्थ विक्री करणा-यां दुकानदार यांचे वर सिगारेट व इतर तंबाखु उत्पादने (जाहिरातीस प्रतिबंध आणि व्यापार, वाणिज्य, उत्पादन, पुरवठा आणि वितरण विनियमन) अधिनियम २००३ व नियम २००४ चे कलम प्रमाणे विशेष मोहिम राबवुन कडक कारवाई करण्याचे आदेश अंमली पदार्थ विरोधी पथक ०१ व पथक २ यांना देवून मार्गदर्शनपर सूचना दिलेल्या होत्या.

त्यानुसार दिनांक १५/०८/२०२२ ते दिनांक ३०/०८/२०२२ या पंधरवडयाचे कालावधीत अंमली पदार्थ विरोधी पथक १ चे प्रभारी अधिकारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री विनायक गायकवाड व अंमली पदार्थ विरोधी पथक २ चे प्रभारी अधिकारी श्री प्रकाश खांडेकर यांनी त्यांचे अधिपत्याखालील अधिकारी व स्टाफचे मदतीने पुणे शहरातील समर्थ, बंडगार्डन, सिंहगडरोड, वारजे माळवाडी, कोरेगांव पार्क, भारती विदयापीठ, येरवडा, वानवडी, चतुःश्रृंगी पोलीस ठाणेचे कार्यक्षेत्रात शाळा कॉलेजस चे १०० यार्ड परिसरात वैधानिक ईशारा नसलेल्या तंबाखुजन्य पदार्थ व सिगारेट याची विक्री करणारे ३० पान टपरी चालकांवर तसेच वैधानिक ईशारा नसलेले विदेशी सिगारेट, तंबाखुजन्य पदार्थ विक्री करणारे १९ दुकानदार यांचेवर कोटपा अॅक्ट नुसार १९ खटले दाखल करून त्यामध्ये ८,४७,६१९/- रु कि चे वैधानिक ईशारा नसलेले विदेशी सिगारेट, तंबाखुजन्य पदार्थ जप्त करुन कारवाई करुन एकुण ४९ खटले सिगारेट व इतर तंबाखु उत्पादने (जाहिरातीस प्रतिबंध आणि व्यापार, वाणिज्य, उत्पादन, पुरवठा आणि वितरण विनियमन) अधिनियम २००३ व नियम २००४ चे कलम E ( overline a ) २४ व ७ (२) २० (२) (कोटपा अॅक्ट) प्रमाणे कारवाई करण्यात आलेली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post