राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोल्हापूर जिल्हा भरारी पथकाकडुन गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर एकुण रुपये 9,87,200/- किंमतीची गोवा दारू वाहतूकीवर कारवाईप्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर :  राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोल्हापूर जिल्हा भरारी पथकाकडुन गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर एकुण रुपये 9,87,200/- किंमतीची गोवा दारू वाहतूकीवर कारवाई करण्यात आली.

मा.आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य, मुंबई श्री. कांतिलाल उमाप, मा. संचालक श्री. सुनिल चव्हाण (दक्षता व अंमलबजावणी), राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य, मुंबई व मा. विभागीय उपआयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, कोल्हापूर विभाग, कोल्हापूर, श्री. बी. एच.तडवी यांचे आदेशान्वये तसेच कोल्हापूर जिल्हा मा. अधीक्षक श्री. रविंद्र आवळे व मा. उपअधीक्षक श्री. राजाराम खोत राज्य उत्पादन शुल्क, कोल्हापूर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा भरारी पथक, कोल्हापूर या पथकास दिनांक 09/09/2022 रोजी मिळालेल्या बातमीनुसार कोल्हापूर शहर च्या हद्दीत जुना पुन्हा बेंगलोर हायवे वरून गोवा दारूची वाहतूक होणार आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्यानंतर राज उत्पादन शुल्क भरारी पथकाने सापळा लावून पहाटे 05.00 वाजण्याच्या सुमारास   बेकायदा गोवा दारूची वाहतूक पकडली परुंतु सदर आरोपीत इसम हे गोवा विदशी मदयाने भरलेले वाहन जागीच सोडून अंधाराचा फायदा घेवून पसार झाले. वाहनातील ओळखीच्या पुराव्या वरून त्यांची नावे व पत्ता 01. पवन पोवार रा. चंदगड, ता.चंदगड,जि. कोल्हापूर व नारायण कृष्णा पाटील, रा. नागवे, ता.चंदगड जि कोल्हापूर अशी समजले .

सदर आरोपीत इसमाकडून टोयोटो कंपनीची कवॉलिस कार तिचा रजिस्टर क्रमांक एम एच 04BY-0080सह गोवा दारूचे 90 बॉक्स जप्त केले. असा एकूण मुद्देमाल किंमत 9,87,200/- इतकी आहे. सदर आरोपीत इसम हा सराईत गुन्हेगार असुन त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत.  आरोपीतांवर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला असुन अजून इतर आरोपीचा  शोध घेण्यात येत असल्याचे पथक प्रमुख निरीक्षक श्री. पी. आर. पाटील यांनी सांगितले.


सदर कारवाईत कोल्हापूर जिल्हा भरारी पथकाचे निरीक्षक श्री. पी. आर. पाटील, दुय्यम निरीक्षक विजय नाईक, गिरीशकुमार कर्चे, जवान सर्वश्री सचिन काळेल, मारुती पोवार ,राजेंद्र कोळी, जय शिनगारे यांनी सहभाग घेतला.


सदर गुन्हयाचा पुढील तपास चालूआहे असे निरीक्षक श्री. पी. आर. पाटील यांनी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post