माजी जिल्हा परिषद सदस्या कडून जिल्हा कोर्टाच्या मनाई आदेशाला केराची टोपली..

  शेतकऱ्याची 14 एकर जमीनीवर मारला डल्ला.


प्रेस मीडिया लाईव्ह :

आप्पासाहेब भोसले : 

मौजे निमशिरगाव येथील   राजेखान बापू बागसार व मौला दादा यांची गट नंबर 233 शेत्र 5 हेक्टर 38 शेत जमीन भावकीच्या वादामुळे जिल्हा कोर्टात दावा चालू असताना एका जिल्हा परिषद सदस्यांनी मध्यस्थीच्या नावाखाली  कागदपत्रे घेऊन व चुकीची माणसे, रजिस्टर कार्यालय येथे दाखवून, सदरची बोगस साठे खत, व खरेदी दस्ता मध्ये  खरेदी करून शेतकऱ्यांची फसवणूक केली व सदर जमीन सांगलीत एका व्यावसायिकास  विक्री केली हि खरेदी पूर्णतः चुकीच्या पद्धतीने केली असल्यामुळे, व माननिय जिल्हा कोर्टाचा आदेश डावलून आज त्या जमिनीतील भू उत्खनन करत आहेत, व यापूर्वीही त्यांनी सदर जमिनीचे भूत्खनन करून मातीची  विल्हेवाट लावून सदर जागेवर आपल्या व्यावसायिकाचा डोलारा उभा केला आहे. 

त्यामुळे माननिय जिल्हा कोर्टाचा आदेश आल्यानंतर भविष्यात त्या शेतकऱ्याला त्या जागेवरती काहीही करता येणार नसून त्या शेतकऱ्यावर आज उपासमारीची वेळ आली असल्यामुळे,


प्रहार संघटना व बागसार कुटुंबीयांनी माननीय प्रांताधिकारीसो यांना निवेदन देऊन बेमुदत उपोषण व जन आंदोलन करण्याचे निवेदन दिले असून,जर येत्या आठ दिवसात जिल्हा कोर्टाच्या मनाई आदेशाचे सन्मान पूर्वक अंमलबजावणी करून संबंधितावर तात्काळ कायदेशीर कारवाई करावी, व कारवाई न झाल्यास, फौजदारी दाखल न झाल्यास प्रहार संघटना व बागसार कुटुंब प्रांत कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास बसण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. निवेदनावर सुनील शिंदे, दादासो बागसार,चंद्रकांत लोखंडे ,दादासो सुतार,नजीर नदाफ,दत्ता माने, सदानंद कांबळे, यांच्या सह्या असून माननिय प्रांताधिकारीसो यांनी तात्काळ सदर गट नंबरची संपूर्ण चौकशी करून संबंधित शेतकऱ्याला योग्य तो न्याय मिळवून द्यावा अशी मागणी संघटनेकडून करण्यात येत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post