येवलेवाडी भागातून बंदी घातलेल्या गुटख्याची विक्री करणाऱ्या व्यापाऱ्याला अटक ,

5 लाख 29 हजार रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला.


प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे : येवलेवाडी भागातून बंदी घातलेल्या गुटख्याची विक्री करणाऱ्या व्यापाऱ्याला गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथक एकने अटक केली. त्याच्याकडून 5 लाख 29 हजार रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला.नेमाराम लच्छाराम प्रजापती (वय -38, रा. दत्तविहार सोसायटी, येवलेवाडी) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

कोंढवा भागात अमली पदार्थ विरोधी पथकाचे पथक गस्त घालत होते. त्यावेळी येवलेवाडीतील निंबाळकर वस्तीवर घरात गुटख्याचा साठा करुन ठेवल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांना मिळाली. त्यानंतर पथकाने तेथे छापा टाकून प्रजापतीला ताब्यात घेतले. त्याने साठा केलेला 5 लाख 29 हजार रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला.

ही कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, अपर आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक आयुक्त गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, सहायक निरीक्षक शैलजा जानकर, एपीआय लक्ष्मण ढेंगळे, सुजीत वाडेकर, पांडुरंग पवार, सचिन माळवे, प्रवीण उत्तेकर, मनोजकुमार साळुंखे, राहुल जोशी, संदेश काकडे, रेहाना शेख, नीतेश जाधव, योगेश मोहिते, संदीप शिंर्के, विशाल दळवी यांनी केली.

'येवलेवाडी परिसरात गुटख्याचा साठा करून विक्रीच्या तयारीत असलेल्या व्यापाऱ्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पथकाने छापा टाकून सव्वा पाच लाखांचा गुटखा जप्त केला.'

विनायक गायकवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अमली पदार्थ विरोधी पथक एक

Post a Comment

Previous Post Next Post