खोतवाडी गावचे सरपंच व ग्रामसेवक यांची महाराष्ट्र शासनाच्या आदेशालाच वाटण्याच्या अक्षदाप्रेस मीडिया लाईव्ह :

महाराष्ट्र शासनाने 2016 मध्ये लाड - पागे यांच्या शिफारस आयोगातून सफाई कर्मचारी यांच्यासाठी शासन निर्णय क्रमांक 2015 प्रत क्रमांक 268 / 12 मार्च 2016 रोजी पारित करून महाराष्ट्रातल्या सर्व सफाई कामगार म्हणून सेवानिवृत्त झालेल्या,किंवा होणाऱ्या अथवा सेवानिवृत्ती घेणाऱ्या, किंवा सेवेत असताना निधन पावलेल्या, अनुसूचित जाती व इतरही जातीतील सफाई कर्मचारी यांचा वारस किंवा नातेवाईक यांना सदरचे योजनेचा लाभ देण्यात यावा,अशी स्पष्ट तरतूद करण्यात आले असून सुद्धा ग्रामपंचायत खोतवाडी चे सरपंच व ग्रामसेवक यांनी महाराष्ट्र शासन निर्णयाला तिलांजली देत खोतवाडी गावची सफाई कामगार श्री बाळू मायाप्पा कांबळे हे सेवानिवृत्त झाले असून, त्यांच्या घरची परिस्थिती अत्यंत हालाकीची असलेने त्यांना रोजंदारीवर सफाई कामगार म्हणून नेमणूक करण्याचा आदेश जावक क्रमांक 469 / 2022 नुसार 19 एप्रिल 2022रोजी हातकणंगले गटविकास अधिकारी मोकाशी मॅडम यांनी दिनांक 19 एप्रिल 2022 रोजी खोतवाडी ग्रामपंचायतीला लेखी आदेश देण्यात आले आहे

मात्र ग्रामपंचायत प्रशासनाने बीडीओंच्या आदेशाला तिलांजली  देऊन आपणच  खोतवाडी गावचे सर्वस्व आहोत असे स्वताला समजत आहेत. त्यांच्या या हेखेखोर स्वभावाला खोतवाडी गावातील नागरिक त्रस्त असून, येत्या निवडणुकीत त्यांना योग्य ते जागा दाखवू अशी नागरिकांतून चर्चा होत आहे.Post a Comment

Previous Post Next Post