इचलकरंजी : महानगरपालिकेच्या वतीने घरगुती गणेश मुर्ती विसर्जनासाठी ठेवलेल्या कृत्रिम विसर्जन कुंडास शहरवासियांचा उस्फूर्त प्रतिसाद

जवळपास 10375 गणेश मूर्तीचे विसर्जन कृत्रिम विसर्जन कुंडासह शहापूर खण येथे करून जवळपास 13.9 टन निर्माल्य जमा करून महानगरपालिका प्रशासनाने पर्यावरण पूर्वक गणेशोत्सव साजरा करणेसाठी केलेल्या आवाहनाला चांगलाच  प्रतिसाद मिळाला .

प्रेस मीडिया लाईव्ह :

कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी : श्रीकांत कांबळे. 

इचलकरंजी शहरामध्ये पर्यावरण पुर्वक गणेशोत्सव साजरा करणेच्या आवाहनानुसार सोमवार दि. ५ सप्टेंबर रोजी झालेल्या घरगूती गणेश मूर्ती विसर्जना साठी महानगरपालिकेच्या वतीने घरगुती गणेश मुर्तीचे विसर्जन करणेसाठी शहापुर खण तसेच शहरातील सर्वच प्रभागामध्ये  जवळपास ७२ ठिकाणी सुंदररित्या फुलांची सजावट केलेले कृत्रीम गणेश मूर्ती  विसर्जन कुंड आणि निर्मांल्य कुंडाची व्यवस्था करणेत  आलेली होती.  महानगरपालिकेच्या  वतीने ठेवणेत आलेल्या कृत्रिम विसर्जन कुंडाच्या सुविधेस इचलकरंजीशहरवासीयांनी उस्फुर्तपणे प्रतिसाद दिला.

       काल संपूर्ण दिवसभरात इचलकरंजी शहरातील नागरिकांनी रात्री १० वाजेपर्यंत जवळपास १०३७५  गणेश मूर्तींचे विसर्जन  कृत्रिम विसर्जन कुंडासह शहापूर खण येथे करून तसेच जवळपास १३.९ टन निर्माल्य जमा करून  महानगरपालिका प्रशासनाने  पर्यावरण पुर्वक गणेशोत्सव साजरा करणेसाठी केलेल्या आवाहनाला चांगला प्रतिसाद दिला.  

  या घरगुती गणेश विसर्जन सोहळ्याकरिता महानगरपालिके कडुन २ यांत्रिक बोटी,२ क्रेन,  २ अग्निशमन वाहने, २ रुग्णवाहिका , ३० आयशर टेंपो, ५ ट्रॅक्टर यासह महानगरपालिकेचे सर्व सहा आयुक्त, कामगार अधिकारी, लेखाधिकारी, लेखापरीक्षक,  शहर अभियंता,जल अभियंता, आरोग्य अधिकारी, विद्युत अभियंता, सर्व विभाग प्रमुख, प्रशासन अधिकारी  प्राथमिक शिक्षण विभाग, शिक्षक- शिक्षिका,  स्वच्छता निरिक्षक, प्रभाग अधिकारी यांचेसह जवळपास ७२०

अधिकारी-कर्मचारी , 

५० स्वयंसेवक तसेच इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय पथक  संपूर्ण दिवस कार्यरत होते तसेच महानगरपालिकेच्या या सर्व यंत्रणेवर उपायुक्त डॉ.प्रदीप ठेंगल आणि प्रभारी अधिकारी तथा प्रशासक सुधाकर देशमुख पुर्णवेळ लक्ष ठेवून होते.

   महानगरपालिके कडून करणेत आलेल्या पर्यावरणपुर्वक गणेशोत्सवाच्या या आवाहनाला उस्फुर्तपणे प्रतिसाद देवुन सहकार्य केल्याबद्दल  प्रभारी अधिकारी तथा प्रशासक सुधाकर देशमुख  यांनी शहरवासीयांचे आभार व्यक्त केले आहे

Post a Comment

Previous Post Next Post