इनाम संघटनेने मुलभूत नागरी समस्या घेतल्या जाणून

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

इचलकरंजी येथे इनाम संघटनेच्या वतीने इनाम आपल्या दारी या उपक्रमांतर्गत घोरपडे नाट्यगृह परिसरात मुलभूत नागरी समस्या जाणून घेण्यात आल्या.तसेच या समस्या मार्गी लावण्याची इनाम सदस्यांनी महापालिका प्रशासनाकडे मागणी केली.

इनाम संघटनेच्या माध्यमातून इचलकरंजी शहरातील मुलभूत नागरी समस्यांबाबत आवाज उठवून त्या मार्गी लावण्यासाठी महापालिका प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात येतो.या संघटनेने इनाम आपल्या दारी या उपक्रमांतर्गत शहरातील विविध प्रभागांना भेटी देऊन त्याठिकाणचे रस्ते ,गटारी ,ड्रेनेज , स्वच्छता,कचरा उठाव ,औषध फवारणी ,अतिक्रमण यासह विविध मुलभूत नागरी समस्या जाणून घेत त्या मार्गी लावण्यासाठी महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा सुरु ठेवला आहे.त्यामुळे बहुतांश मुलभूत नागरी समस्या मार्गी लागण्यास मोठी मदत झाली असून नागरिकांना दिलासा मिळत आहे.याच अनुषंगाने इनाम संघटनेच्या सदस्यांनी नुकताच घोरपडे नाट्यगृह परिसरात नागरिकांना उदभवत असलेल्या विविध मुलभूत नागरी समस्या जाणून घेतल्या.यामध्ये पाण्याच्या टाकीतून पाणी पुरवठा होत असलेल्या पाइपलाइनला गळती , नाट्यगृह परिसरात वाढलेले गवत , उद्यानातील अस्वच्छता अशा विविध समस्या दिसून आल्या.यावेळी महापालिकेच्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरुन संपर्क साधून याबाबतची सविस्तर माहिती देऊन सदर समस्या तात्काळ मार्गी लावण्याची मागणी करण्यात आली.त्यानुसार संबंधित अधिकाऱ्यांनी यंञणा कार्यान्वित करुन मुलभूत नागरी समस्या मार्गी लावण्याची ग्वाही देत प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली.त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून  समाधान व्यक्त होत आहे.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते शैलेश गोरे , वासुदेव बांगड ,इनाम संघटनेचे हरीष देवाडिगा ,उदय निंबाळकर ,दीपक अग्रवाल , संदेश निमणकर ,राम आडकी ,राजू कोन्नूर ,शितल मगदूम , अभिजीत पटवा यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post