खालापूर चे तहसीलदार आयुब तांबोळी यांना दिले निवेदन

 दांड फाटा ते मोहपाडा खड्ड्यांच्या विरोधात उद्या दिनांक 25 ऑगस्ट रोजी काँग्रेसचे रास्ता रोको आंदोलन


प्रेस मीडिया लाईव्ह

सुनील पाटील

खडयांच्या विरोधात उद्या दि. 25 ऑगस्ट रोजी काँग्रेसचे रास्तारोको आंदोलन रसायनी : दांडफाटा ते मोहोपाडा रस्त्यावर पडलेल्या खडयांच्या विरोधात काँग्रेस पक्ष आक्रमक झाला आहे. हे खड्डे बुजवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याला जाग येण्या साठी खालापूर तालुका काँग्रेस चे अध्यक्ष कृष्णाशेठ पारंगे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाचे एक शिष्टमंडळ आज खालापूर चे तहसीलदार आयुब तांबोळी यांना भेटले व त्यांना रस्ते दुरुस्ती साठी गुरुवार दि.25 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता आंदोलन करण्यात येत असल्याचे एक लेखी निवेदन दिले.यावेळी खालापूर तालुका काँग्रेस चे अध्यक्ष कृष्णाशेठ पारंगे, रायगड जिल्हा काँग्रेस चे सरचिटणीस प्रमोद राईलकर, जेष्ठ नेते अनंता दळवी, रायगड जिल्हा युवक काँग्रेस चे अध्यक्ष निखिल डवळे,उपाध्यक्ष सागर सुखदरे, देविदास म्हात्रे, संजय कांबळे उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post