कोल्हापूर जिल्ह्यात सुरु असलेल्या संतधार पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत पुन्हा एकदा वाढ होऊ लागलीप्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर जिल्ह्यात सुरु असलेल्या संतधार पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत पुन्हा एकदा वाढ होऊ लागली आहे. पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत गेल्या 12 तासांमध्ये 1 फुट 10 इंचांनी वाढून 21 फुट 10 इंचांवर पोहोचली आहे.जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिलेल्या माहितीनुसार दुपारी एक वाजेपर्यंत राजाराम बंधारा पाणी पातळी 21 फुट 10 इंच झाली आहे. पंचगंगेची इशारा पातळी 39 फुट, तर धोका पातळी 43 फुट आहे. पावसाच्या संतधार पावसा मुळे जिल्ह्यातील अजूनही 13 बंधारे पाण्याखाली आहेत.

दुसरीकडे, पाणलोट क्षेत्रामध्ये होत असलेल्या पावसाने राधानगरी धरणाचा सहाव्या क्रमांकाचा उघडला गेला आहे. धरणातून सध्या 3 हजार 28 क्युसेक्सने विसर्ग सुरु आहे. कोल्हापूर शहर परिसरात पावसाने उघडीप दिली असली, तरी राधानगरी, गगनबावडा तसेच भुदरगड तालुक्यात पावसाचे प्रमाण जास्त आहे.

गेल्या आठवडाभरापासून कोल्हापूर शहर परिसरात पावसाने उघडीप दिल्याने पुराचा धोका टळला. पावसाने उघडीप दिली असली, तरी अधूनमधून होत असलेल्या सरींनी उभ्या पिकांना वरदान मिळाले आहे. ऑगस्टच्या मध्यावधीपर्यंत दमदार पाऊस झाल्याने जिल्ह्यातील बहुतांश सर्व धरणे भरली आहेत. कडवी, चिकोत्रा, चित्री, जंगमहट्टी, जांबरे तसेच कोदे धरण पूर्ण क्षमतेने भरली आहेत.


अलमट्टी धरणातून विसर्ग सुरुच

अलमट्टी धरणही पूर्ण क्षमतेने भरले आहे. त्यामुळे अलमट्टी धरणातून विसर्ग कायम आहे. अलमट्टीतून 57 हजार 500 क्युसेकने कृष्णा नदीत विसर्ग सुरु आहे. हिप्परगी धरणातूनही 40 हजार क्युसेकने विसर्ग सुरु आहे.


Post a Comment

Previous Post Next Post