आजादी का अमृत महोत्सव" निमित्त "हर घर तिरंगा" या उपक्रमा अंतर्गत 'कॉलेज ऑफ एज्युकेशन (बी.एड) पेठ वडगाव या महाविद्यालयांमध्ये ध्वजारोहण करण्यात आले.प्रेस मीडिया लाईव्ह :

आज दिनांक 13 ऑगस्ट 2022 रोजी श्री बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ अंबप संचलित कॉलेज ऑफ एज्युकेशन बी.एड पेठ वडगाव येथे "आजादी का अमृत महोत्सव" निमित्त "हर घर तिरंगा" या उपक्रमा अंतर्गत 'कॉलेज ऑफ एज्युकेशन (बी.एड) पेठ वडगाव या महाविद्यालयांमध्ये ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहणाच्या वेळी कॉलेजच्या माननीय प्र.प्राचार्य सौ.निर्मळे आर्. एल् आणि प्राध्यापक वर्ग, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. 

"आजादी का अमृत महोत्सव" अंतर्गत दिनांक 11/8/ 2022 ते 15/8/2022 या कालावधीत महाविद्यालया मध्ये राखी  स्पर्धा,मेहंदी स्पर्धा,रांगोळी स्पर्धा,स्लोगन स्पर्धा अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी संस्थेचे अध्यक्ष विजयसिंह माने व कार्याध्यक्ष विकासराव माने यांचे मार्गदर्शन लाभले.

Post a Comment

Previous Post Next Post