शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचे अपघाती निधन झाले

 विनायक मेटे यांच्या झालेल्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळाला मोठा हादरा बसला.


प्रेस मीडिया लाईव्ह :

शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांचे आज अपघाती निधन झाले मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवर झालेल्या भीषण अपघातात विनायक मेटे यांच्या झालेल्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळाला मोठा हादरा बसला आहे. ते 52 वर्षांचे होते. 


या अपघातात गंभीररीत्या जखमी झालेल्या विनायक मेटे यांच्या निधनाने अनेकांना धक्का बसला आहे. या अपघाता आधीचा मृत्यूपूर्वीचा विनायक मेटे यांचा अखेरचा फोटो समोर आला आहे. या मध्ये विनायक मेटे यांचा रक्तबंबाळ झालेला चेहरा दिसून आलाय. त्यांना एका स्ट्रेचरवर झोपवण्यात आलं होतं. त्यांना शुद्ध नव्हती. पिवळ्या रंगाचा एक शर्ट विनायक मेटे यांनी घातलेला होता. त्याच्या शर्टाच्या खिशाला भारताचा झेंडा तिरंगाही होता. हनुवटीला आणि चेहऱ्याच्या खालच्या बाजूला मोठं रक्त लागल्याचंही दिसून आलं होतं. तसंच शर्टावरही रक्ताचे डाग लागल्याचं दिसून आलंय.

 या अपघातामुळे विनायक मेटे यांच्या निधनामुळे प्रचंड हळहळ व्यक्त केली जातेय.

Post a Comment

Previous Post Next Post