' कलानुभूती ' च्या ' कथकोन्मेश ' नृत्य सादरीकरणाला उत्स्फूर्त प्रतिसाद !



प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे : कलानुभूती ' संस्थेतर्फे ' आयोजित  'कथकोन्मेश ' नृत्य सादरीकरणाला मंगळवारी रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.  हा कार्यक्रम 30 ऑगस्ट 2022 रोजी यशवंतराव चव्हाण नाटयगृह , कोथरूड सायंकाळी ५ वाजता झाला.  युवा नर्तिका सौ. अस्मिता ठाकूर यांच्या कलानुभूती संस्थेचे वार्षिक नृत्य सादरीकरण या  कार्यक्रमात उत्साहात सादर करण्यात आले.गेली १५ वर्ष कलानुभूती सेंटर ऑफ़ कथक ही  संस्था पुण्यात कथक नृत्याच्या क्षेत्रात कार्यरत आहे.

' कथकोन्मेष' या वार्षिक कार्यक्रमाच्या पूर्वार्धात, गणेश वंदना, तालचतुरंग, अभंग, यमन रागातील तराणा, मल्हार, कवित्तमाला यांसारख्या पारंपारिक रचनांचे सादरीकरण झाले.  कार्यक्रमाच्या उत्तरार्धात 'चक्रव्युह- भावनांची रणनीती' हे नवीन अनोखे नृत्य सादरीकरण ' कलानुभूती ' संस्थेतर्फे सादर करण्यात आले. स्त्रीशी निगडीत वेगवेगळी नाती अर्थात बहिण ,बायको, आई-मुलगा यांसारख्या नात्यांच्या बंधनात भावनांमध्ये अडकलेल्या स्त्रियांच्या कथा पौराणिक संदर्भासह कथक नृत्यातून प्रभावी पद्धतीने दाखवण्यात  आल्या. पुण्यातील अनेक नामवंत कलाकार हया कार्यक्रमाला उपस्थित होते. 



Post a Comment

Previous Post Next Post