जातीय व धार्मिक उन्माद माजवणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी : राहुल डंबाळेप्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे : जातीय व धार्मिक उन्माद माजवणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी तसेच अशा प्रकारच्या घटना रोखण्यासाठी केंद्र सरकारने विशेष मोहीम हाती घ्यावी अशी मागणी आज संविधान परिवार च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आंदोलनातून रिपब्लिकन युवा मोर्चाचे नेते राहुल डंबाळे यांनी केली.राजस्थान, सुराणा येथील इंद्र मेघवाल या नऊ वर्षीय विद्यार्थ्यांचा पिण्याच्या पाण्याच्या माठाला हात लावला म्हणुन जातीय कारणातून खून करण्यात आला होता. तसेच गुजरात दंग्याच्या वेळी बिल्कीस बानो या गर्भवती महिलेवर सामूहिक बलात्कार करून तिचे नातेवाईकांची व मुलीची हत्या करणाऱ्या नराधम आरोपींची शिक्षा पूर्व सुटका करण्याच्या गुजरात सरकारच्या निर्णयाविरुद्ध आज पुणे येथील विविध पुरोगामी पक्ष संघटनांच्या संयुक्त विद्यमाने संविधान परिवार तर्फे पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर तीव्र निदर्शनाचे आंदोलन आयोजित करण्यात आले होते.

आंदोलनाच्या अनुषंगाने आयोजित निषेध सभेमध्ये भूमिका मांडताना रिपब्लिकन युवा मोर्चाचे नेते राहुल डंबाळे यांनी केंद्र सरकार तसेच राजस्थान व गुजरात सरकारवर टीका करत असताना “ दलित व मुस्लिमांना सातत्याने अत्याचाराला सामोरे जावे लागत आहे तसेच त्यांना न्याय नाकारला जाणे हे भारतीय लोकशाहीसाठी अत्यंत घातक असून अशा घटनांच्या विरुद्ध सर्वसमावेशक निषेध होणे आवश्यक आहे. पण असा निषेध नोंदवला जात नाही हे अत्यंत निषेधार्ह आहे.  अशा प्रकारच्या घटना रोखण्यासाठी केंद्र सरकारने व राज्य सरकारांनी विशेष मोहीम हाती घेणे आवश्यक आहे. “ असे मत व्यक्त केले.

“ नरेंद्र मोदी व भाजपा परिवाराची बिलकिस बानो प्रकरणी सुरुवातीपासूनच न्याय नाकारण्याची भूमिका राहिली असल्याने संधी मिळताच त्यांनी बिल्कीस बानोच्या आरोपींना थेट मदत करण्याचे कारस्थान करून या देशातील अल्पसंख्यांक समुदायाचा कायद्यावरील विश्वास डळमळीत करण्याचा प्रयत्न भाजप व मोदी यांनी केली असल्याची टीका मूलनिवासी मुस्लिम मंचाचे अध्यक्ष. अंजुम इनामदार यांनी केली. तसेच दलित मुस्लिमांवरील अत्याचाराच्या विरोधात लवकरच सर्वसामावेशक आंदोलन उभे करणार असल्याचेही त्यांनी सांगितले

सदर प्रसंगी भारतीय दलित कोब्राचे संस्थापक एडवोकेट भाई विवेक चव्हाण, रिपब्लिकन युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष सुवर्णाताई डंबाळे, भीमआर्मी बहुजन एकता मिशनचे दत्ताभाऊ पोळ, निताताई अडसुळ, संभाजी ब्रिगेडचे संतोष शिंदे, शिवसेना चे डॉ. अमोल देवळेकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे समीर शेख,लहुजी परिषदेचे अनिल हतागळे, रुग्ण हक्क परिषदेचे उमेश चव्हाण, जिजाऊ ब्रिगेडच्या प्राची दुधाने, समता परिषदेच्या सपना माळी, गौरी पिंगळे, स्नेहल कांबळे, किरण रशीद , इब्राहीम खान, सगई नायर, अमजद भाई, ख्रिश्चन रिजनल सोसायटीचे  श्री. बनसोडे,  कामगार नेते अरुण कांबळे, किरण सोनावणे , विजय सोनावने , अभिजीत कांबळे , रोहन कांबळे , अजिंक्य कांबळे व इतर मान्यवर सहभागी झाले होते. 

यावेळी पुणे जिल्हाधिकारी कार्यालय समोर कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा करीत दोन्ही घटनेचा निषेध केला व पुणे जिल्हा अधिकारी मा. राजेंद्र देशमुख यांना निवेदन ही सादर केलेPost a Comment

Previous Post Next Post