भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली इंदापूर नगर परिषदेवर भाजपचा झेंडा पुन्हा फडकविला जाईल , असा विश्वास

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

जब्बार मुलाणी 

 इंदापूर : इंदापूर नगर परिषद निवडणुकीचे भाजप प्रभारी मारुती वणवे, सहप्रभारी गोरख शिंदे व इतरांनी बैठकीत बोलताना, 'केंद्रात व राज्यात असणारी भाजपची सत्ता, हर्षवर्धन पाटील यांच्यासारखे भाजपला लाभलेले अभ्यासू व विकासाभिमुख नेतृत्व याचा फायदा निवडणुकीत भाजपला होणार आहे, असे मत व्यक्त केले. आगामी नगर परिषदेची निवडणूक सर्व कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन एकजुटीने लढवण्यात येईल, अशी माहिती दिली. बैठकीच्या प्रारंभी प्रभारी व सहप्रभारीपदी निवड झाल्याबद्दल मारुती वणवे व गोरख शिंदे यांचा सत्कार करण्यात आला.

भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली इंदापूर नगर परिषदेवर भाजपचा झेंडा पुन्हा फडकविला जाईल, असा विश्वास इंदापूर नगर परिषदेच्या निवडणुकी संदर्भात झालेल्या भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या दुसऱ्या बैठकीत व्यक्त करण्यात आला. इंदापूर अर्बन बँक सभागृहात शनिवारी (दि. ६) ही बैठक झाली.

भाजपचे शहराध्यक्ष शकील सय्यद, धनंजय पाटील, अशोक इजगुडे, शेखर पाटील, रघुनाथ राऊत, कैलास कदम, पांडुरंग शिंदे, प्रशांत उंबरे, आदिकुमार गांधी, जगदीश मोहिते, मेघश्याम पाटील, बंडा पाटील, सुनील अरगडे, संदीप पाटील, सचिन जामदार, शुभम पवार, सागर गानबोटे, गुड्डू मोमीन, गणेश पाटील, धीरज शहा, शिवराज भिसे, ललेंद्र शिंदे, बापू भोसले, शेरखान पठाण, संतोष देवकर, अशोक खेडकर, अमित जौजाळ, अमोल राऊत, अमोल माने, नितीन मखरे, अजिंक्य जावीर, अभिजित अवघडे आदी भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते बैठकीस उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post