राष्ट्रवादी युवक काँग्रेस तर्फे दत्तवाडी, आकुर्डी,रुपेश कॉलोनी,एकता नगर या भागात नागरीकांना भारतीय राष्ट्रध्वज तिरंगा झेंड्याचे मोफत वाटपप्रेस मीडिया लाईव्ह :

पिंपरी : देशाच्या 75 व्या स्वतंत्रतादिनानिमित्त देशभरात जल्लोष पाहायला मिळत आहे. युवक अध्यक्ष इम्रानभाई शेख यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांमध्ये व युवकांमध्ये देशभक्तीची भावना निर्माण व्हावी.आपल्या पूर्वजांनी देशाला स्वातंत्र्य करण्यासाठी दिलेल्या बलिदानांची आठवण व सन्मान युवकांच्या ह्रुदयात रहावी यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रभागात तीन हजार राष्ट्रध्वज नागरिकांना मोफत उपलब्ध करून दिला जात आहे.

या संकल्पनेतून  राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष लवंकुश यादव यांच्या वतीने आज दत्तवाडी, आकुर्डी,रुपेश कॉलोनी,एकता नगर, या भागातील ६०० नागरिकांना   घरोघरी,तसेच या परिसरातील व्यावसायिक यांच्या दुकानात जावून ‘भारतीय राष्ट्रध्वज’ मोफत वाटण्यात आले.

यादी राष्ट्रवादी युवक काँग्रेस तर्फे युवक अध्यक्ष इम्रानभाई शेख यांच्या नेतृत्वात भोसरी येथील इंद्रायणी नगर परिसरात या मोहिमेची सुरुवात झाली. चिखली कुदळवाडी पूर्णा नगर येथे राष्ट्रवादी युवक चे जिल्हा सरचिटणीस दीपक गुप्ता यांच्या माध्यमातून,तसेच रुपीनगर निगडी तळवडे येथे युवा नेते राहुलभाऊ पवार, अनुज देशमुख, यांच्या वतीने राष्ट्रध्वज वाटप करण्यात आले. चिंचवड डांगे चौक परिसरात कार्याध्यक्ष प्रसन्न डांगे यांच्या माध्यमातून तर काळेवाडी नढेनगर या भागात शहर सचिव निखिल घाडगे व ओम शिरसागर यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात राष्ट्रध्वज वाटप करण्यात आले.

Post a Comment

Previous Post Next Post