आम आदमी पक्षाने भाजपच्या या ऑपरेशनचा चांगलाच भंडाफोड केला



प्रेस मीडिया लाईव्ह :

 वी दिल्ली - भारतीय जनता पक्षाने दिल्लीचे सरकार पाडण्यासाठी ऑपरेशन लोटस अंतर्गत आम आदमी पक्षाच्या ज्या चार आमदारांना धमकावले होते व त्यांना पैशाची ऑफरही दिली होती त्या आमदारांनी पत्रकार परिषदेत सादर करून आम आदमी पक्षाने भाजपच्या या ऑपरेशनचा चांगलाच भंडाफोड केला.पक्ष फोडण्यासाठी भाजपने या आमदारांना प्रत्येकी 20 कोटी रुपयांची ऑफर दिली होती. ती ऑफर न स्वीकारल्यास त्यांना सीबीआय आणि ईडीच्या केसेस मध्ये अडकवण्याची धमकी देण्यात आली होती, असा दावा या चार आमदारांनी केला आहे.

येथे पत्रकार परिषदेला संबोधित करताना, आपचे राष्ट्रीय प्रवक्‍ते आणि राज्यसभा खासदार संजय सिंह म्हणाले की, अजय दत्त, संजीव झा, सोमनाथ भारतीय आणि कुलदीप या आमदारांशी भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) नेत्यांनी संपर्क साधला होता. ज्यांच्याशी त्यांचे ” मैत्रीपूर्ण संबंध होते. त्यांनी भाजपमध्ये प्रवेश घेतल्यास त्यांना प्रत्येकी 20 कोटी रुपये आणि इतर आमदारांना सोबत आणल्यास 25 कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली आहे, असे संजय सिंह म्हणाले.

त्यांनी ही ऑफर स्वीकारली नाही तर त्यांना मनीष सिसोदिया यांच्याप्रमाणे ईडीच्या कारवाईला सामोरे जावे लागेल, अशी धमकीही त्यांना देण्यात आली. हे चारही आमदार आज पत्रकार परिषदेला उपस्थित होते व त्यांनी आपल्याला भाजपने धमकावून तसेच पैसे देण्याची ऑफर देऊन फोडण्याचा प्रयत्न केला होता असे स्पष्ट केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post