इचलकरंजीत मनसे प्रणित मराठी कामगार सेनेच्या शाखेचे उद्घाटन

 मनसे उपजिल्हाध्यक्ष रवी गोंदकर यांच्यासह विविध मान्यवरांची प्रमुख उपस्थितीप्रेस मीडिया लाईव्ह :

इचलकरंजी येथे मनसे प्रणित मराठी कामगार सेनेच्या खंजिरे इंडस्ट्रीयल इस्टेट शाखेचे उद्घाटन मनसेचे उपजिल्हाध्यक्ष रवी गोंदकर यांच्या हस्ते व शहरप्रमुख प्रताप पाटील यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.

मनसे प्रणित मराठी कामगार सेनेच्या माध्यमातून संघटीत क्षेञातील कामगारांना संघटीत करुन त्यांना न्याय मिळवून दिला जातो.याशिवाय शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी देखील प्रयत्न केला जातो.इचलकरंजी शहर परिसरात मनसे प्रणित मराठी कामगार सेनेचे कार्य मोठ्या जोमाने सुरु आहे.नुकताच या संघटनेच्या खंजिरे इंडस्ट्रीयल इस्टेट शाखेचे उद्घाटन मनसेचे उपजिल्हाध्यक्ष रवी गोंदकर यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी त्यांनी मराठी कामगार सेनेच्या माध्यमातून कष्टकरी, कामगार वर्गाला नव्या मिळवून देतानाच मनसे पक्ष अधिक भक्कम होण्यासाठी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रयत्नशील रहावे ,असे आवाहन केले.यावेळी मनसेचे शहराध्यक्ष प्रताप पाटील ,उपतालुकाध्यक्ष शहाजी भोसले , सहकार सेना जिल्हाध्यक्ष मनोहर जोशी , मराठी कामगार सेनेचे तालुकाध्यक्ष महेश शेंडे ,उपजिल्हाध्यक्ष योगेश दाभोळकर , जिल्हा सरचिटणीस जावेद नदाफ , शहराध्यक्ष अमित पाल , उपशहराध्यक्ष रोहित जाधव यांची प्रमुख होती.यावेळी नितीन कटके , जेम्स तडाखे , दिलीप जाधव , संग्राम पोरे , प्रमोद भाटले , रोहित कोटकर , विशाल पाचपुरे ,मनोज पाटील , संदिप भगत ,साहिल कोकटनुर , ऋषीकेश पाटील यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post