कोल्हापूर जिल्हा पोलीस प्रमुख मा श्री शैलेश बलकवडे यांचे सक्षम शाळा...सदृढ शाळा या उपक्रमांतर्गत

गावभाग पोलीस ठाण्याचे वतीने गोविंदराव हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज इचलकरंजी येथे व्याख्यान आयोजित केले होते.


प्रेस मीडिया लाईव्ह :

श्रीकांत कांबळ : 

कोल्हापूर जिल्हा पोलीस प्रमुख मा श्री शैलेश बलकवडे साहेब यांचे सक्षम शाळा...सदृढ शाळा या उपक्रमांतर्गत आज गावभाग पोलीस ठाण्याचे वतीने गोविंदराव हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज इचलकरंजी येथे व्याख्यान आयोजित केले होते.

   याप्रसंगी पोलीस निरीक्षक श्री राजू ताशीलदार यांनी सदर कॉलेज मधील  11 वि 12 वि च्या विध्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत असताना शालेय जीवनात अभ्यासाला महत्व देण्याबरोबरच याच वयात योग्य करिअर निवडण्याचा सल्ला ही दिला.आपल्याला आपले ध्येय व उद्दिष्ट गाठायचं असेल कठोर परिश्रम करायलाच हवं. परिश्रमा शिवाय करिअर शक्य नाही. त्यामुळे या वयात आपल्या आई वडिलांना आपल्याला ज्या उद्देशाने शाळेत पाठवले आहे त्या उद्देशाने आपण चिकाटीने अभ्यासाला लागा नाहीतर छोट्या मोठ्या कारणामुळे आपण गुन्ह्यात याल आणि आपल्या आई वडिलांनी आपल्यासाठी घेतलेले परिश्रम मातीमोल कराल.

     यावेळी ऍड दिलशाद मुजावर यांनी कायदेविषयक माहिती देताना अल्पवयीन मुला-मुलींच्या अत्याचारात दिवसेंदिवस वाढ होत आहे.पोक्सो सारखे गंभीर गुन्हे आसपास च्या सर्व पोलीस ठाण्यात नोंद होत आहेत.त्याचबरोबर अल्पवयीन मुले व्यसनाच्या आहारी जात आहेत त्यामुळे बालगुन्हेगारिमध्ये झपाट्याने वाढत आहे ही चिंतेची बाब आहे.आपण सर्वांनी किशोरवयीन वयात आपल्या अभ्यासावर, पुस्तकावर,गुरुजनांवर, आई वाडीलासह आपल्या भाऊ- बहिणीवर प्रेम करा.

     शालेय विध्यार्थी सध्या अभ्यासाऐवजी मोबाईलचा अतिरेक वापर करीत आहेत.मोबाईल मधील व्हाट्स अप,फेसबुक व इन्स्टाग्रामवर फेक आयडी बनवून सामान्य जनतेची फसवणूक होत आहे. त्यामुळे विध्यार्थ्यांना सायबर क्राईम विषयी माहिती देण्यात आली.

     निर्भयाच्या पोलीस उपनिरीक्षक उर्मिला खोत यांनी निर्भया पथकाच्या कामकाजाबाबत माहिती दिली.शाळेच्या परिसरामध्ये तक्रार पेटी बसवावी.कोणाची तक्रार असेल तर सदर पेटीमध्ये टाकावी सदर तक्रारीची दखल घेऊन गरज पडल्यास संबंधित व्यक्तीवर योग्य ती कारवाई केली जाईल याची हमी दिली.*

      यावेळी प्राध्यापक विकास कांबळे सरांनी वाढत्या गुन्ह्यांच्या अनुषंगाने शालेय विध्यार्थ्यांना संरक्षण व सूरक्षतेसाठी मार्गदर्शन व समुपदेशन करण्यात केले.

       यावेळी सूत्रसंचालन युवराज मोहिते सरांनी केले तर स्वागत व प्रस्ताविक उपप्राचार्य राजाराम झपाटे सरांनी केले.तर उपस्थित मान्यवरांचे आभार सौ कवठे मॅडम यांनी मानले.*

              या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री चिंचवाडे सर,गजानन शिरगांवे ( सामाजिक कार्यकर्ते)शिक्षक - शिक्षिका,निर्भया पथकातील स्वाती जाधव,अंकुश कुंभार,दरिकांत देवमोरे तसेच विद्यार्थी - विध्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Post a Comment

Previous Post Next Post