इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त मुख्य ध्वजारोहण समारंभ प्रभारी अधिकारी तथा प्रशासक सुधाकर देशमुख यांच्या शुभहस्ते राजाराम स्टेडियम येथे मोठ्या उत्साहात साजरा


प्रेस मीडिया लाईव्ह :

हातकणंगले तालुका प्रतिनिधी : श्रीकांत कांबळे

  इचलकरंजी महानगर पालिकेच्या वतीने  सोमवार दि.१५ ऑगस्ट २०२२ रोजी भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी  दिनानिमित्त  मुख्य ध्वजारोहण समारंभ प्रभारी अधिकारी तथा प्रशासक   मा.सुधाकर देशमुख यांच्या शुभहस्ते तसेच आमदार प्रकाशराव आवाडे आणि उपायुक्त डॉ. प्रदीप ठेंगल यांच्या प्रमुख उपस्थितीत   राजाराम स्टेडियमवर  मोठ्या उत्साहात साजरा करणेत आला .

    अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने यावर्षी महानगर पालिकेच्या  रविंद्रनाथ टागोर विद्यानिकेतन प्राथमिक शाळेच्या १००० विद्यार्थ्यांचे समुह नृत्य, राष्ट्र सेवा दल यांच्या ७७५ विद्यार्थ्यांचे एरोबिक नृत्य तसेच माई बाल विद्या मंदिर विद्यार्थ्यांचे समुह नृत्य, सरस्वती हायस्कूलच्या  विद्यार्थी - विद्यार्थीनींचे समुहगान याचबरोबर शहरातील माध्यमिक शाळा आणि महाविद्यालयांच्या एन. सी.सी.,एम.सी.सी.च्या विद्यार्थ्यांच्या सहभागानेआजचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

    या कार्यक्रमासाठी   मेजर प्रा. मोहन विरकर, मेजर प्रा.सी.पी.कोरे, प्रा.शेखर शहा, प्रा.मेजर प्रमिला सुर्वे, प्रा.संतोषी    जावीर, शाहू हायस्कूल मुख्याध्यापक शंकर पोवार, संजय परीट, जितेंद्र कुलकर्णी, रविंद्रनाथ टागोर शाळा मुख्याध्यापिका अलका शेलार ,संजय कांबळे आदींचे मोलाचे सहकार्य लाभले.

          याप्रसंगी माजी उपनगराध्यक्ष तानाजी पोवार, माजी नगरसेवक सागर चाळके, शशांक बावचकर, प्रकाश मोरबाळे, महादेव गौड,अब्राहम आवळे,नगर सचिव विजय राजापुरे, सहा.आयुक्त केतन गुजर, शहर अभियंता संजय बागडे यांचे सह स्वातंत्र्य सैनिक, महानगरपालिकेचे विभाग प्रमुख,शहरातील विविध संस्थांचे प्रतिनिधी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post