कोंढव्यात स्वातंत्र्यदिन साजराप्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे : इनक्रेडिबल समाजसेवक ग्रुपच्या वतीने शिवनेरी ढोली ताशा पथकासह अक्षय साळुंके यांच्या नेतृत्वाखाली  ध्वजारोहण करून प्रभात फेरी काढण्यात अली.

 मिठानगर भागातील हरिजन इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले .यावेळी इनक्रेडिबल समाजसेवक  ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष अस्लम इसाक बागवान प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक, पदाधिकारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. 

   अतुलनीय सामाजिक कार्यकर्ता ग्रुप आणि लोकसेवा सोशल फाऊंडेशन आणि जमाते उलेमा कुल जमाते तन जिम यांच्या संयुक्त विद्यमाने रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यातील मुस्लिम समुदायाचे योगदान या रॅली मध्ये अधोरेखित करण्यात आले. 'भारत बचाओ' 'संविधान बचाव'अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.या रॅलीचे आयोजन मौलाना अबुलकलाम आझाद चौक ते ज्योती चौक कोंढवापर्यंत करण्यात आले होते.  यामध्ये उलेमावो मदरशांमध्ये शिकणाऱ्या मुलांसह हजारो नागरिक उपस्थित होते.Post a Comment

Previous Post Next Post