100 कोटी द्या मंत्रीपद मिळवा..!' चक्क आमदारालाच ऑफर आल्यानं खळबळ, चौघांना अटक, नेमकं प्रकरण काय?



प्रेस मीडिया लाईव्ह

सुनील पाटील

मुंबई : एकीकडे राज्याच्या मंत्रिमंडळ  विस्ताराकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. तर दुसरीकडे चक्क मंत्रीपद देण्यासाठी 100 कोटी रुपयांची मागणी देण्यात आल्याचं प्रकरण समोर आलंय. 100 कोटी द्या, मंत्रिपद मिळवा, अशी ऑफर चक्क एका आमदाराच देण्यात आली होती. याप्रकरणी अखेर क्राईम ब्रांचच्या  पथकाने कारवाई करत चौघा भामट्यांचा शोध घेत त्यांना अद्दल अडवली आहे. रियाज शेख, योगेश कुलकर्णी, सागर संगवई आणि जाफर उस्मानी अशी अटक करण्यात आलेल्लाय चौघांची नावं आहेत. राष्ट्रीय समाज पक्षाचे माजी आमदार राहुल कुल  यांनी दिलेल्या तक्रारीनंतर हे सगळं प्रकरण उघडकीस आलंय. 2019 साली राहुल कुल यांनी भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. अखेर या प्रकरणी चौघांना अटक करण्यात आली असून त्यांची आता कसून चौकशी केली जातेय.

कशी दिली ऑफर..?

12 तारखेला रियाज शेख यांने आमदारासोबत संपर्क साधला आणि त्यांना राज्य मंत्रिमंडळात मंत्रिपद मिळवून देतो, अशी ऑफर दिली. एक मोठी व्यक्ती आपलं काम करुन देईल, पण त्यासाठी 100 कोटी रुपये द्यावे लागतील, असं त्यानं आमदार साहेबांना सांगितलं. नंतर 100 ऐवजी 90 कोटी रुपयांत काम होईल, अशीही डील करण्याचा प्रयत्न झाला. पण आधी 20 टक्के रक्कम द्या, अशी मागणी रियाजने केली होती. आमदार साहेबांनीही 20 टक्के रक्कम देऊ, असं मान्य केलं. तोपर्यंत कुणाला कळणार नाही, अशाप्रकारे या सगळ्याबाबत पोलिसांनाही माहिती दिली.

सोमवारी रियाज 18 कोटी घेण्यासाठी ऑबेरॉय हॉटेलमध्ये आला. ठरल्याप्रमाणे आमदारसाहेबही तिथे होते. अखेर जेव्हा रियाज आमदारांना भेटण्यासाठी आला, तेव्हा पोलिसांनी त्याला रंगेहाथ पकडला. यानंतर रियाझला पोलीस चौकशीसाठी घेऊन गेले. तपासादरम्यान, रियाझने आपले सगळे पत्ते उघड केले.

योगेश कुलकर्णी आणि सागर संवगवई यांच्याशी संगनमत करुन आमदाराची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला गेल्याचं तपासातून निष्फन्न झालं. त्यानंतर याच प्रकरणात सागर आणि योगेशसह जाफर उस्मान याचाही या सगळ्यात हात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. अखेर पोलिसांनी तिघांनाही अटक केली. अटक करण्यात आलेल्या सगळ्यांकडून सात मोबाईल फोन आणि सीमकार्डही हस्तगत करण्यात आले आहेत. सध्या पोलीस या सगळ्या जप्त केलेल्या मुद्देमालाच्या आधारे पुढील तपास करत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post