धान्य हवे असेल तर हप्ता द्यावा लागेल , पनवेल तहसिल कार्यालयाकडून मागणी

 वसुली शाहीला आळा घाला न पेक्षा दुकानदार राजीनामे देतील अशी तहसीलदाराना विनवणी

सध्या व्हाट्सअप ग्रुपला सर्वीकडे चर्चेचा विषय रंगला आहे


प्रेस मीडिया लाईव्ह : 

सुनील पाटील :

रास्त धान्य दुकानदारांना शासकीय नियमानुसार  बायोमेट्रिक रेशनकार्ड संख्येनुसार धान्य पाहिजे असेल तर हप्ता द्यावा लागेल. तहसीलदाराना हप्ता  द्यावा लागतो.  ज्यांना धान्य वाढविण्याचे आहे त्यांनी हप्ता दयायलाच पाहिजे . नाही तर जी स्थिती आहे तीच राहिल. अशी मागणी पनवेल तहसील पुरवठा कार्यालयातील अव्वल कारकून करत आहेत अशी तक्रार रास्त दुकानदार बी सी भोईर यांनी तहसीलदार विजय तळेकर यांच्याकडे लेखी निवेदनाने करत  पनवेल तहसिलदारांची भष्ट्र कारभाराची लक्तरे वेशीवर टांगलीं आहेत. याची प्रत जिल्हा पुरवठा अधिकारी अलिबाग,  मा . विभागिय कोकण आयुक्त सी.बी.डी. बेलापूर याना देण्यात आल्या आहेत. या बाबत अव्वल कारकून व पुरवठा अधिकारी यांची चौकशी चालू असून  पनवेलमधील जनतेला न्याय मिळेल.

भोईर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की वाढीव रेशनकार्ड प्रमाणे वाढीव धान्य मिळविण्यासाठी ज्यांची परिस्थिती असेल तो हप्ता देईलही. पण माझ्या सारखे गरिब दुकानदार काय करणार याचा विचार आपल्या अधिकाऱ्यांना करायला सांगा . मला नाही वाटत की , आपण आपल्या अधिकाऱ्यांना असे सांगितले असेल . परंतु आपल्या नावावर अधिकारी मालामाल होत आहे . काही दुकानदारचे शिवभोजनचेही  हप्ते लावलेले आहेत . पण आतापर्यंत आम्हाला ऑफीसमधे कोणीही पैशाची मागणी केलेली नाही . सर्व कामे त्वरीत होत होती. पण जोशी बाई आल्यापासून सर्व विस्कळीत झाले आहे. कधी कधी तर बाई आम्हाला बोलते की , मी स्थानिक आहे . माझ्यावर दुकानदारांनी दबाव टाकायचा नाही . बाईसोबत काय बोलायचे काही समजत नाही . आम्ही खरोखर सर्व दुकानदार एक दिवस राजीनामा देणार आहोत . कारण ही जोशी बाई  ऐकत नसेल तर काय करणार ? हेच नाही तर एक दिवस मी गावातील एका माणसाचे रेशन कार्ड काढायचे असल्याने जोशी बाईला विचारले असता एका कार्डचे ५००० / - हजार रुपये लागतील नाहीतर एजेंन्टकडे जा ते आपल्याला बरोबर सांगतिल . मी खरेच खंदारे नावाचे एजंन्ट कडे गेलो असता त्यांनी १०००० / - दहा हजार सांगितले मी तोंडात बोटे घालून गप्पच राहिलो . नंतर बोललो साहेब एवढे कसे तर त्यांनीच मला सांगितले की मी सोडून कोणत्याही एजेन्टकडे जा हे सर्व माझ्यापेक्षाही तुम्हाला जास्तच सांगतिल कारण जोशी बाइंच एका कार्डमागे ५००० / - रुपये घेते. फक्त मी जे कार्ड करायला सांगेल तेच करायचे बाकीच्यांना तारखा देवुन फेऱ्या मरायला लावायचे. बिचारे शेतुतील मुलांना ऐकावे लागते . काय  करणार? त्यांना बाईने तशी तंबीच दिली की , आणि कोणतीही गोष्ट बाहेर जाता कामी नाही . नाही तर तुमची खैर नाही . साहेब आपल्या कार्यालयात असे जर चालत राहिले तर गरीबांनी काय करायचे ? पण यांच्यामागे कोणीतरी असल्याशिवाय एवढे बिनधास्त  होवूच शकत नाही अशी आम्हा दुकानदारासह पनवेलमधील जनतेची संतप्त प्रतिक्रिया आहे. 

पनवेल तहसील कार्यालयाला काही दिवसापासून भष्ट्राचाराची कीड लागली आहे. पनवेल तालुका पुरवठा अधिकार्याच्या  नियोजनशून्य कारभारामुळे दुकानात धान्य वेळेवर  उपलब्ध होत नाही.  झालेच तर १२-१४ दिवस ऑन लाईन एन्ट्री करण्यात येत नसल्याने  पावतीच निघत नाही. त्यामुळे धान्य वितरण करता येत नसल्याने दुकानदारांना ग्राहकांच्या असंतोषाला सामोरे जावे लागत आहे.तालुक्यातील बायोमेट्रिक थंब पध्दत पुर्णतः कोलमडून पडली आहे,अशा परिस्थितीत लाभार्थी रेशनकार्ड धारक रास्त धान्यापासून  वंचित राहत आहेत.दुकानदारांच्या मासिक कोट्यातील नियमित धान्य व मोफत धान्यात कमी जास्त प्रमाणात अधिक तफावत आढळून येत आहे असे रास्त दुकानदार बोलत आहेत  वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार व शासनाच्या नियमानुसार  बायोमेट्रिक रेशनकार्ड संख्येनुसार धान्य देण्यास हरकत नाही अशा स्पष्ट शब्दांत सुचनाही पनवेल पुरवठा अधिकारी व पुरवठा अव्वल कारकून यांना यापूर्वी देण्यात आल्या असताना वाढलेल्या रेशन कार्डचे  धान्य वाढवून मिळण्यासाठी दहा हजार हप्ता मागत असल्याचा आरोप रास्त धान्य दुकानदार बी एस भोईर यांनी केला आहे. 

पनवेल तहसिलदार विजय तळेकर यांना रेशनचे धान्य कळंबोली येथील एक रास्त धान्य दुकानदार रात्री 8.35 वाजताच्या दरम्यान दुकानाच्या बाहेर रिक्षा टेम्पो लावून व रिक्षा लावून ट्रक मधून माल विकत असल्याचा व्हिडिओ त्यांच्या कार्यालयात जावून दाखविण्यात आली. हाच व्हिडिओ पुरवठा अधिकारी प्रदीप कांबळे यांना दाखवीत आला आहे.त्याची साधी चौकशी करण्याची तसदी या कार्यालयाकडून घेण्यात आली नाही. याचा अर्थ सगळी मिलीभगत असल्याचे समजायचे का?  पनवेल तहसिलदार कार्यालय त्यांची खाजगी मालमत्ता असल्याच्या आविर्भावात  आहेत. तसेच रास्त धान्य वाटपात मोठी तफावत असून प्रधानमंत्री मोफत धान्य योजने अंतर्गत धान्याचे नियतन अथवा ऑडीट नियमाने होणे बंधनकारक असताना ते केले जात नाही. आजपर्यंत मासिक भरणा चलन झालेला नसताना मोफत धान्य परमिट तयार करून गोदाम मध्ये पाठविण्याची आवश्यकता नाही तसेच एका दुकानदाराच्या माध्यमातून दहा दुकानदार यांचे १०० % चलन भरणा  केला जात आहे अन्य एका दुकानदार मार्फत पाच दुकानदार यांना १०० % चलन भरणा करण्यात येत आहे अशा धुतराष्ट्र कारभार पनवेल तहसिल कार्यालयात चालू आहे. यावर कुठेतरी आवर घाला अशी विनंती दुकानदार बी सी भोईर यांनी पनवेल तहसिलदार यांना लेखी निवेदनाने केली आहे. 

 याबाबत पनवेल तहसिलदार विजय तळेकर याना वारंवार संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.

Post a Comment

Previous Post Next Post