क्राईम न्यूज : मुंबईतील कुख्यात गुंड विक्रांत देशमुख पणजीत जेरबंदप्रेस मीडिया लाईव्ह

सुनील पाटील

 मुंबई येथे अनेक गुन्हे करून पसार झालेला व मुंबई पोलिसांचा वाँटेड कुख्यात गुन्हेगार विक्रांत उर्फ विकी देशमुख याला रात्री पणजी पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अशी माहिती उत्तर गोवा पोलीस अधीक्षक सोबीत सक्सेना यांनी आज दिली.

पणजी येथे आयाेजित पत्रकार परिषदेत दिली.

या वेळी सोबीत सक्सेना यांनी सांगितले की, विक्रांत उर्फ विकी देशमुख हा मुंबई पोलिसांसाठी वाँटेड गुन्हेगार आहे. त्याच्यावर खून, खुनाचा प्रयत्न करणे, लूटमार करणे, दरोडा घालणे, चोरी करणे, धमकी देणे, तसेच खंडणी वसूल करणे, आदी ३१ गुन्हे नोंद आहेत. त्याच्यावर २००८ तसेच २०११ साली मुंबई पोलिसांनी मोक्का लावला होता. मुंबई पोलीस त्याच्या शोधात होते. तो गोव्यात आल्याची खबर मुंबई पोलिसांकडून पणजी पोलिसांना मिळाली होती. पणजी पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक निखिल पालेकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने पणजी येथील कसिनोमध्ये सापळा लावला. विक्रांत उर्फ विकी देशमुख याला अटक करण्यात आली.त्याच्याकडे एक शस्त्र सापडल्याचे अधीक्षक सक्सेना यांनी सांगितले.

१९९८ पासून विक्रांत देशमुख यांची गुन्हेगारी सुरू झाली होती. त्याने नेरूळ मुंबई येथील सचिन गरजे यांचे अपहरण करून त्यांची निर्घृण हत्या केली. त्यानंतर त्यांचा मृतदेह समुद्रात टाकला होता. समुद्रातून मृतदेह किनाऱ्यावर आल्यानंतर तो मृतदेह जाळून पुरण्याचे कृत्य विकी देशमुख याच्या गँगने केले होते. पणजी पोलिसांनी त्याला पकडले असून त्याने गोव्यातही कोणाकडे खंडणीसाठी वगैरे प्रयत्न केला आहे का ? याचा तपास पोलीस करत आहेत. त्यानंतर मुंबई पोलिसांकडे विकी देशमुख याला सुपूर्त करण्यात येणार असल्याचे सक्‍सेना यांनी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post