पेण को ऑप अर्बन बँक ठेवीदारांना 5 लाख रुपये देऊन दिलासा द्यावा..



प्रेस मीडिया लाईव्ह

रायगड जिल्हा : सुनील पाटील

आज  नवी  दिल्ली येथे  केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ  भागवतजी कराड  साहेब यांची  भेट  घेऊन  12 वर्षांपासून दीड लाख पेण को ऑप बँक  ठेवीदारांचे  पैसे  अडकून आहेत  ते लवकरात लवकर पैसे  परत  देण्याची प्रकिया करावी  ही विनंती करून  निवेदन  दिले.  अनेक ठेवीदार  75 वर्षाचे  वरील  आहेत . त्याच्या ठेवीवरील  व्याजावर  त्यांचा उदरनिर्वाह होतं असे. परंतु  बँक  बुडीत निघाल्या पासुन त्यांची अवस्था फार वाईट आहे. अनेक ठेवीदार  धसक्याने  मयत सुद्धा झाले. 

 मोलमजुरी  करून  भविष्यासाठी  जमा  केलेल्या पुंजीवर  डल्ला मारून बँकेचे  विश्वस्त मोकाट फिरत आहेत. अनेकांचे  उदयोग धंदे  चौपट    झाले काहींची  लग्न होऊ शकली  नाहीत. अनेक खासगीत  येऊन व्यथा मांडतात रोज खर्चाला  सुद्धा पैसे  नाहीत काय करावे  सुचत  नाही  आत्महत्या करण्याची हिम्मत नाही म्हणुन नाहीतर  जीवन  संपविले असते असेही सांगतात. म्हणूनच  सर्व बाबींचा सहानभूती पूर्वक विचार  व्हावा असे सांगितले. संपूर्ण निवेदन  गांभीर्याने ऐकून घेतले  आणि  खूपच  गंभीर  आहे असे म्हणाले. त्यावर कराड साहेबांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन  आपण  नक्की मार्ग काढू  सांगितले.  5 लाख  रुपये देण्याच्या प्रक्रियेसाठी काही गोष्टीच्या अडचणी   आहेत  त्यावर रिझर्व बँक आणि इतर  संबंधिताशी  चर्चा  करून  लवकरात  लवकर  निर्णय करून  ठेवीदारांना त्यांच्या हक्काचे  पैसे  देऊ असे आश्वासन दिले. याप्रसंगी राहुल मसणे ,सर्वेश  गोगटे , सर्वेश  गोगटे उपस्थित होते.

#PMOffice #BJP4Maharashtra #DevendraFadnavis #ChandrakantDadaPatil #PrashantThakur

Post a Comment

Previous Post Next Post