नांदणीच्या कु. सिद्धी बुबणे हिचे बुद्धिबळ स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून यश



प्रेस मीडिया लाईव्ह :

नांदणी /प्रतिनिधी: 

महाराष्ट्र राज्य शालेय पंधरा वर्षाखालील मुलींची फिडे रॅपिड रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेत नांदणी (ता. शिरोळ) येथील केंद्रीय शाळेची विद्यार्थिनी कु. सिद्धी प्रदीप बुबणे (इयत्ता पाचवी) हिने राज्यातील सरकारी शाळेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून यश मिळवले. चेन्नई येथे होणाऱ्या स्पर्धेत सहभागी होण्याचा मान तिला मिळाला आहे.

ऑल इंडिया चेस फेडरेशन व महाराष्ट्र चेस असोसिएशन यांच्या मान्यतेने सांगली जिल्हा बुद्धिबळ संघटनेने सांगली येथे ४४ व्या फिडे बुद्धिबळ ओलिंपियाड उत्सवानिमित्त ही स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये सिद्धी बुबणे हिने साडेपाच गुण मिळवत सर्वोत्कृष्ट खेळाडूचा बहुमान मिळविला. या स्पर्धेत कोल्हापूरसह, सांगली, सातारा, पुणे या जिल्ह्यातील विद्यार्थिनींनी सहभाग घेतला होता. यामध्ये सर्वात जास्त गुण मिळवून सिद्धी ही पुढील ओलिंपियाड स्पर्धेत सहभागी होत आहे.

 या स्पर्धेसाठी तिला तिचे आई-वडील, बुद्धिबळ प्रशिक्षक रोहित पोळ, केंद्रीय शाळा नांदणीचे मुख्याध्यापक विश्वास मोरे, सर्व शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य यांचे मार्गदर्शन लाभले. तिचे या यशाबद्दल कौतुक होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post