दौंड तालुका पंचायत समिती निवडणुकी मध्ये राजेगांव गणामध्ये प्रहार जनशक्ती पक्षाच्या सीमा शितोळे-देशमुख संभाव्य उमेदवारप्रेस मीडिया लाईव्ह :

जब्बार मुलाणी 

राजेगांव : दौंड तालुका पंचायत समिती निवडणुकीमध्ये राजेगाव गणामध्ये प्रहार जनशक्ती पक्षाच्या संभाव्य उमेदवार असणार आहेत सीमा शितोळे - देशमुख या राजेगांवच्या माजी उपसरपंच असून सध्या ग्रामपंचायत सदस्य आहेत . राजेगांव ग्रामपंचायत निवडणुकीत दुसऱ्या वार्डात अपक्ष उभे राहून निवडणुकीत त्यांनी बाजी मारली होती .राजेगाव मधील बचत गटासाठी त्यांचे खूप मोठे योगदान आहे . 

 समाजकार्यातही त्या अग्रेसर असतात .दिव्य समाज निर्माण संस्थेच्या त्या सचिव आहेत .दिव्य समाज निर्माण संस्थचे दौंड तालुक्यात उल्लेखनीय सामाजिक कार्य आहे . प्रहार जनशक्ती पक्षाचे दौंड तालुकाध्यक्ष रमेश  शितोळे - देशमुख यांच्या त्या पत्नी आहेत . रमेश शितोळे -  देशमुख यांनी दौंड तालुक्यात प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारे आंदोलन करून दौंड तालुक्यातील शेतकरी कष्टकरी गोरगरीब जनतेला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे त्यांच्या सामाजिक आणि पक्ष कार्याचा त्यांना पंचायत समिती निवडणुकीत फायदा होऊ शकतो .

Post a Comment

Previous Post Next Post