अन्वीने लहान वयात केली कळसुबाई शिखर सरप्रेस मीडिया लाईव्ह :

 टाकळीवाडी : नामदेव निर्मळे

 मूर्ती लहान कीर्ती महान याचे उदाहरण कुमारी अन्वी चेतन घाटगे रा.कोल्हापूर येथील येथील 2 वर्षे 11 महिन्यच्या या मुलगीने एक वेगळे व कमी वयातील रेकॉर्ड केले असुन ती भारतातील  सर्वात लहान गिर्यारोहक ठरली आहे . जगात भारी आम्ही कोल्हापुरी ही म्हण आज खरोखर सत्यात उतरत आहे.

 महाराष्ट्रातील सर्वोच्च कळसुबाई शिखर सर करणारी  2 वर्षे 11 महिन्यच्या  अन्वी  प्रेरणादायी ठरली असुन फक्त  सव्वा तीन तासांमध्ये कळसुबाई सर करून एक नवा विक्रम केला. तिला गिर्यारोहक टीम व ग्रामपंचायत बारी, यानी प्रशस्तीपत्र व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आले आहे .या मोहिमेसाठी आई अनिता -वडील चेतन यांचे मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन  लाभले. खेळण्याच्या वयात हे रेकॉर्ड केल्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना एक प्रेरणादायी ठरेल . 

  अन्वीचा आम्हाला अभिमान आहे .आज मुलींना कुठल्याही क्षेत्रात कमी समजू नये.मुलींना देखील सन्मान दिला पाहिजे . मुलगी नको म्हणणाऱ्यांना एक ही एक चपराक आहे .असे तिची आई वडील पत्रकारांशी बोलताना सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post