अनिल परबांचा गेम करणाऱ्याला शिंदेंचं गिफ्ट,

 शेवटच्या श्वासापर्यंत शिवसेनेत राहू म्हणणारा मुख्यमंत्र्यांच्या गटात !

प्रेस मीडिया लाईव्ह

सुनील पाटील

 शिवसेना पक्षा पुढच्याअडचणी काही कमी व्हायचं नाव घेत नाहीयेत. एकनाथ शिंदे  यांनी आमदारांना फोडल्यानंतर आता लोकसभे मध्येही शिवसेनेला धक्का बसणार आहे.

शिवसेनेचे 18 पैकी 12 खासदार वेगळा गट तयार करण्याच्या तयारीत आहेत. त्यातच आता शिवसेनेचे नेते आणि पदाधिकारीही त्यांच्या पदाचा राजीनामा देत आहेत. कोकणातले शिवसेनेचे मोठे नेते रामदास कदम  यांनी त्यांच्या शिवसेना नेतेपदाचा राजीनामा दिला आहे. हा राजीनामा देताना त्यांनी उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं आणि त्यांच्याबाबतची नाराजी व्यक्त केली.

खरंतर रामदास कदम हे गेल्या काही काळापासून शिवसेनेमध्ये नाराज आहेत. उद्धव ठाकरेंचे अत्यंत जवळचे सहकारी असलेले अनिल परब हे रामदास कदम यांच्यामुळेच अडचणीत आले, असं बोललं गेलं. अनिल परब यांच्या कोकणातील रिसॉर्टवर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आक्षेप घेतले, तसंच हे रिसॉर्ट बेकायदेशीर असल्याचं सांगत तक्रार केली. या रिसॉर्टसंबंधी सोमय्या यांना रामदास कदम यांच्याकडूनच मदत झाल्याचं बोललं गेलं.

एवढच नाही तर रामदास कदम यांची या रिसॉर्टबाबत बोलत असल्याची एक ऑडियो क्लिपही व्हायरल झाली. रामदास कदम यांनी मात्र या क्लिपमध्ये माझा आवाज नसल्याचं सांगत आरोप फेटाळून लावले. रिसॉर्टचा वाद संपत नाही तोच रामदास कदम यांनी पत्रकार परिषद घेत अनिल परब यांच्यावर आरोप केले. आम्हाला विचारात न घेता कोकणात अनिल परब शिवसेनेत हस्तक्षेप करत असल्याचं तसंच आपला मुलगा योगेश कदम याला डावलून त्रास दिला जात असल्याचा आरोपही रामदास कदम यांनी केला. तसंच या पत्रकार परिषदेमध्ये आपण शेवटच्या श्वासापर्यंत शिवसेनेसोबत राहू असं कदम म्हणाले होते. रामदास कदमांना नेतेपद शेवटच्या श्वासापर्यंत शिवसेनेमध्ये राहू म्हणणारे रामदास कदम आता शिंदे गटात सामील झाले आहेत. शिवेसना शिंदे गटाच्या कार्यकारिणीमध्ये नेतेपदी रामदास कदम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post