इचलकरंजी : मनपा आयुक्तांच्या कठोर भूमिकेमुळे कामचुकार ठेकेदारांची बसली पाचावर धारण

 आयुक्त सुधाकर देशमुख  यांचे कौतुक होत असून त्यांनी घेतलेल्या कठोर निर्णयाचे  नागरिकांनी स्वागत केले आहे .

प्रेस मीडिया वृत्तसेवा :

मनु फरास :

इचलकरंजी : मनपा आयुक्तांच्या कठोर भूमिकेमुळे कामचुकार ठेकेदारांची  बसली पाचावर धारण . या बाबत नागरिकातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे 

नगरपालिकेच्या काळात पालिकेतील विविध विभागातील कामाच्या फायली, टेंडर ठेकेदारच  सर्व हाताळत होते व त्यांच्या सल्ल्यानेच टेंडर मधील अटी – शर्ती तयार करण्यात यायच्या , प्रत्येक विभागात विशिष्ट ठेकेदारांची मक्तेदारीच तयार झालेली आहे. बांधकाम खाते , आरोग्य विभाग  ठेकेदारच चालवतात की काय  ?  असे चित्र पालिकेत आहे. त्यामुळे वर्षानु वर्षे ठरावीक, वर मर्जीतील ठेकेदारांनाच वर्कऑर्डर मिळत असे . यासाठी मोठ्या प्रमाणात अर्थपूर्ण चर्चा असायची. यातून जागेवर काम नसताना अनेक कामांची बोगस बिले सादर करून पैसे उकळल्याच्या घटना यापूर्वी पालिकेत घडलेल्या आहेत.

तयार वेळी प्रशासनाने या कडे फारसे  गांभीर्याने पाहिलेले नाही. त्यामुळे पालिकेत ठेेकेदार म्हणतील ती पूर्व दिशा अशाच पद्धतीने पालिकेला अक्षरश: ओरबडून खाण्याचे काम जोरदार पणे सुरू होते.  तर काही दिवसांपूर्वी तयार कामाचेच टेंडर काढून बिल उचलण्याचा प्रयत्न होता. पण काही सुज्ञ माजी नगरसेवकांनी सदरचा विषय चव्हाट्यावर आणल्याने टेंडर रद्द करण्याची नामुष्की प्रशासनावर आली. या मुळे पलिकेचे दोन कोटी रुपये वाचले ,  या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर आयुक्त सुधाकर देशमुख यांनी कडक धोरण स्वीकारल्याने  ठेकेदारांची पाचावर धारण बसली आहे शहरवासीयांनी  आयुक्त सुधाकर देशमुख  यांचे कौतुक केले असून त्यांनी घेतलेल्या कठोर निर्णयाचे स्वागत केले आहे .


Post a Comment

Previous Post Next Post