बकरी ईद निमित्त पशुधवगृहामध्ये वाहतूक प्रमाणपत्र व कत्तलपूर्व तपासणीसाठी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची नेमणूकप्रेस मीडिया लाईव्ह :

कोल्हापूर, दि. 8 (जिमाका) : रविवार दि. 10 जुलै रोजी बकरी ईद हा मुस्लिम धर्मियांचा सण आहे. यावेळी मोठ्या प्रमाणावर जनावरांची कत्तल/कुर्बानी देण्यात येते. बकरी ईद निमित्त प्रशासनाने दि. 9 ते 13 जुलै  अखेर पोलिस तपासणी नाके व पशुधवगृहामध्ये अनुक्रमे वाहतूक प्रमाणपत्र व कत्तलपूर्व तपासणीसाठी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची पथके तसेच संनियंत्रण अधिकारी यांच्या नेमणुका केल्या आहेत. यासाठी काही अडचण उद्भवल्यास किंवा अतिरिक्त पशुवैद्यकीय सक्षम प्राधिकाऱ्यांची आवश्यकता असल्यास जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद कोल्हापूर अथवा जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त कोल्हापूर यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. वाय.ए.पठाण यांनी केले. 

राज्यात दि. 4 मार्च 2015 पासून महाराष्ट्र प्राणी रक्षण (सुधारणा) कायदा 1995 लागू करण्यात आला असून, या सुधारीत अधिनियमान्वये व बैलांची कत्तल करण्यास मनाई आहे. स्थानिक प्रशासनास सक्षम प्राधिकाऱ्यांच्या मान्यतेने गरजेप्रमाणे शहरी तसेच ग्रामीण भागामध्ये तात्पुरत्या स्वरुपामध्ये बकरी ईदसाठी कत्तलखान्याची उभारणी करण्यास मुभा देण्यात आली आहे. यासाठी स्थानिक प्रशासनाकडे संपर्क साधावा. कत्तलखान्यामध्ये केवळ महिषवर्गीय जनावरांची सखोल तपासणी करून नंतरच कत्तलयोग्य प्रमाणपत्रे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून दिली जातील. तसेच पोलीस तपासणी नाक्यावर नियमानुसार महिषवर्गीय जनावरे वाहतुकीस योग्य असल्याबाबत प्रमाणपत्र देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

जनावरांची वाहतूक करीत असताना त्यासोबत जनावरांची वाहतूक अधिनियम २००१ मधील नियम क्र. ९६ प्रमाणे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. तसेच वाहतूक अधिनियम १९७८ मधील नियम ४७ अन्वये वाहतूक होणाऱ्या जनावरांची वाहतुकीपूर्वी स्वास्थ्य तपासणी करून अहवाल देण्यासाठी संनियंत्रण अधिकाऱ्यांशी संपर्क साधून प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या अधिनस्त परिवहन निरीक्षकामार्फत योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, असेही डॉ. पठाण यांनी कळविले आहे.


Post a Comment

Previous Post Next Post