सोलापूरचा सराईत तस्कर 'बापू ' चा दबदबा

  तस्करीच्या माध्यमातून टोळ्या गब्बर होत आहेत.

सोलापूर जिल्ह्यातील बापू टोळीने कोल्हापूर सह शेजारच्या जिल्ह्यांत मद्य तस्करीच्या माध्यमातून दहशत निर्माण केली आहे. 

प्रेस मीडिया लाईव्ह :

कोल्हापूर : कोल्हापूरसह शेजारच्या चार जिल्ह्यांत गोवा बनावटीचे मद्य मोठ्या प्रमाणात चोरट्या मार्गाने आयात केले जाते. आजरा मार्गे मद्य काही तासांत कोल्हापुरात पोहोच होते. तस्करीच्या माध्यमातून टोळ्या गब्बर होत आहेत.प्रसंगी ते भरारी पथकावर हल्ले करतात. त्यामुळे राज्य उत्पादनच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांत धास्ती आहे. सोलापूरचा सराईत तस्कर 'बापू' ने तर पश्चिम महाराष्ट्रात दबदबा निर्माण केला आहे. जुजबी 'बापू'ची खोड मोडण्याची गरज सोलापूर जिल्ह्यातील बापू टोळीने कोल्हापूरसह शेजारच्या जिल्ह्यांत मद्य तस्करीच्या माध्यमातून दहशत निर्माण केली आहे. सोलापुरात तीन वर्षांची शिक्षा भोगून तो बाहेर आला आहे. कोल्हापूर हद्दीत त्याच्या तीन पंटरांवर कारवाई झाली. अधिकाऱ्यांकडून त्याची खोड कायमस्वरूपी मोडण्याची गरज आहे.

कारवाईत अडकण्यापेक्षा पथकाने मुळावर घाव घालण्यासाठी दबंगगिरी दाखवण्याची गरज आहे. हातभट्टया ग्रामीण भागात खबऱ्यांचा अभाव पूर्वी भरारी पथकांना पंटर, खबरे अगोदर माहिती देत होते. एका खबऱ्याला दुकानदारांनी बेदम चोप देऊन अर्धमेला केला होता. त्यानंतर कर्मचाऱ्यांना देवीची शपथ देऊन खबर द्यायची नाही, असा दबाव आणला जातो. गोव्यातील पोलिसांकडून भरारी पथकांना सहकार्य मिळत नाही.त्यामुळे चोरटी वाहतूक करणारे सापडत नाहीत, अशी अधिकारीवर्गातून चर्चा होत आहे.

दिवसभर धगधगत असतात. पोलीस व उत्पादन शुल्कने सकाळी छापे मारून कारवाई केली तरी सायंकाळी पुन्हा ते भट्टी लावतात. ग्रामीण भागात निर्जन ठिकाणी असे कारखाने सुरू असतात. याबाबत स्थानिक नागरिकांना याची माहिती असते; पण राज्य उत्पादनच्या अधिकाऱ्यांना ते का सापडत नाहीत, असा सवाल केला जातो. बनावट मद्यासाठी लागणारी रसायने पुरवणारी टोळी सीमाभागात तस्कर सराईत गुन्हेगार नेसरी, आजरा, चंदगड, कणकणवली, वैभववाडी या पोलीस ठाण्यांत संशयित तस्करांवर गुन्हे दाखल आहेत. काही टोळ्यांतील बहुतांश गुन्हेगार बेळगाव, सोलापूर, कोल्हापूर जिल्ह्यांतील आहेत.त्यांच्यावर चोरी, घरफोडी, दरोडा,अपहरण, मारामारी असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. महाराष्ट्राच्या हद्दीत येऊन संशयित वारंवार गुन्हे करतात. इथेनॉल, काळा गूळ, नवसागर हे छुप्या पद्धतीने पोहोचविले जाते. बेळगाव जिल्ह्यातही अनेक ठिकाणी बनावट मद्य तयार करणारे कारखाने आहेत. महामार्गावरील अनेक हॉटेल,  ढाब्यांमध्ये गोवा बनावटीचे,तसेच बनावट मद्य गुपचूप पोहोच केले जाते.

Post a Comment

Previous Post Next Post