नागरिकांच्या तक्रारींची दखल घेऊन मनपा आयुक्त यांनी लवकरात लवकर काम करण्यात येईल असे आश्वासन दिले



प्रेस मीडिया लाईव्ह :

मनु फरास :

 इचलकरंजी : येथील जवाहरनगर येथे पाण्याच्या टाकी जवळ साई समर्थ  नगर मधील गल्ली नंबर दोन मध्ये तीस कुटुंब राहत आहेत , या सर्वांच्या घरांचे सांड पाणी गटारीतीतून जात होते हे सांड पाणी पालिकेने बारा वर्षापूर्वी  इंदिरा कॉलनीतून  काढून दिले होते.  जानेवारी महिन्यापासून सादर ठिकाणी अडवून नळ पुरवठा बंद करण्यात आला आहे. 

या मुळे पाणी पूर्ण पणे  गटारीत तुंबुंन सर्वत्र दुर्गंधी पसरत आहे  या मुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत आहे , तसेच डेंग्यू  व इतर आजार पसरत आहेत. या बाबत प्रशासनाकडे सतत मागणी करून देखील दुर्लक्ष करण्यात येत आहे, तर कधी पोलीस बंदोबस्त सुद्धा मिळत नाही .  या भागातील नागरिकांनी काल महानगरपालिकेच्या दारात या भागातील पत्रकार मनु फरास यांनी सर्व नागरिक व महिला यांना घेऊन  आयुक्तांची भेट घेऊन सर्व  सविस्तर माहिती दिली , या याबाबत मनपा आयुक्त यांनी  लवकरात लवकर काम  करण्यात येईल असे सांगीतले .

 आयुक्तांच्या धाकाने सर्व सुतासारखे  सरळ 

 पूर्वी पालिकेतील कर्मचारी,  पदाधिकारी पालिकेचे मालक असल्यासारखे राहत होते , पण आता नूतन आयुक्तांच्या धाकाने मनपातील कर्मचारी पदाधिकारी  सुतासारखे सरळ येऊन कामात अधिक लक्ष देताना दिसत आहेत हा झालेला बदल पाहून नागरिकांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post