मानद डॉक्टरेट पदवीने मा.श्री.दिलावर मकानदार सन्मानित.

 मानवाधिकार क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल गौरव

प्रेस मीडिया लाईव्ह :

हातकणंगले तालुका प्रतिनिधी : श्रीकांत कांबळे

  रुई ता. हातकणंगले येथील सहारानगर भागातील *ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व ऑल इंडिया ह्युमन राईट असोसिएशन( संयुक्त राष्ट्रसंघ संलग्न )चे राष्ट्रीय गव्हर्नर आणि वेदगंगा टेक्स्टाईल पार्क नेज (कर्नाटक )चे चेअरमन मा.श्री.दिलावर बाबासाहेब मकानदार यांना मानद डॉक्टरेट पदवीने सन्मानित करण्यात आले.




बँकॉक (थायलंड ) येथे 25 जून रोजी आयोजित कार्यक्रमात एशिया पॅसिफिक शिक्षण परिषदेत डल्स युनिव्हर्सिटीच्या वतीने मानवाधिकार क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन  मा. श्री.दिलावर मकानदार यांना मानद डॉक्टरेटने सन्मानित करण्यात आले 

    थायलंडच्या पंतप्रधानांचे सल्लागार आणि इस्लामिक बँक ऑफ थायलंडच्या संचालक डॉ.जारान मालूलिम,थायलंडच्या फिलिप कॅपिटलचे वरिष्ठ उपाध्यक्ष डॉ.मारिस फाइकवॅमडी,पब्लिक ओपिनियन कंबला (युगांडा )चे प्रमुख बुइंझा लुझिंदना आणि थम्मसत युनिव्हर्सिटीचे डॉ.महंमद फईम, कॉमनवेल्थ व्होकेशनल युनिव्हर्सिटीचे उपकुलगुरू रिपूरंजन सिन्हा यांच्या हस्ते डॉ.दिलावर मकानदार यांना मानद डॉक्टरेट देवून त्यांच्या कार्याचा यथोचित गौरव करण्यात आला.

Post a Comment

Previous Post Next Post