खालापूर तालुक्यातील पर्यटन स्थळे व परिसरात कलम 144 लागू



प्रेस मीडिया लाईव्ह :

रायगड जिल्हा प्रमुख प्रतिनिधी : सुनील पाटील

 पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पर्यटक कर्जत तालुक्यातील धबधबे किंवा तलावाच्या ठिकाणी येतात व दुर्देवाने काही प्रमाणात जीवितहानी होण्याच्या घटना घडतात.  त्यामुळे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच धबधबा, धरण व तलाव क्षेत्रात कोणत्याही प्रकारे जीवितहानी होवू नये, 

याकरिता खालापूर तालुक्यातील धामणी कातकरवाडी तलाव, बोरगाव धबधबा, पोखरवाडी बंधारा-बोरगाव, झेनिथ धबधबा व परिसर, आडोशी धबधबा व परिसर, आडोशी पाझर तलाव, मोरबे धरण, नढाळ/वरोसे धरण, पळसाचा बंधारा (टेपाचीवाडी नढाळ), वावर्ले बंधारा, डोणवत धरण, कलोते धरण, माडप धबधबा, भिलवले धरण* या गजबजलेल्या पर्यटनस्थळांच्या ठिकाणी व त्यांच्या 1 कि.मी. परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (1) नुसार पावसामुळे निर्माण झालेले नैसर्गिक धबधब्याच्या परिसरामध्ये मद्यपान करण्यास किंवा मद्यधुंद अवस्थेत प्रवेश करणे, मद्य बाळगणे, मद्य वाहतूक करणे, अनधिकृत मद्य विक्री करणे व उघड्यावर मद्य सेवन करणे, पावसामुळे धोकादायक झालेली ठिकाणे,धबधबे, दऱ्यांचे कठडे, धोकादायक वळणे इ.ठिकाणी सेल्फी काढण्यास व कोणत्याही स्वरुपाचे चित्रीकरण करणे तसेच रहदारीवर परिणाम करणाऱ्या ठिकाणी फोटोग्राफी करणे, पावसामुळे वेगाने वाहणाऱ्या पाण्यात, खोलपाण्यात उतरणे व त्यामध्ये पोहणे.  धबधब्यावर जाणे अथवा पाण्याच्या प्रवाहाखाली करणे.  सायंकाळी 6.00 वाजल्यानंतर ते सकाळी 6.00 वाजेपर्यंत या कालावधीत धबधबे किंवा तलाव या ठिकाणी पाण्यात उतरणे. वाहतुकीचे रस्ते तसेच धोकादायक ठिकाणी वाहने थांबविणे, वाहन अतिवेगाने चालविणे तसेच वाहतूकीस परिणाम, अडथळा होईल, अशा प्रकारे वाहन चालविणे. वाहनाची ने-आण करताना बेदरकारपणे वाहन चालवून इतर वाहनांना धोकदायक स्थितीत ओव्हरटेक करणे, सार्वजनिक ठिकाणी खाद्यपदार्थ, कचरा, काचेच्या व प्लॉस्टिकच्या बाटल्या, थर्माकॉलचे व प्लॉस्टिकचे साहित्य उघड्यावर इतरत्र फेकणे,सार्वजनिक ठिकाणी येणाऱ्या महिलांची छेडछाड करणे, टिंगळटवाळी करणे, महिलांशी असभ्य वर्तन करणे, असभ्य व अश्लील हावभाव करणे, शेरेबाजी करणे अथवा लज्जा निर्माण होईल असे कोणतेही वर्तन करणे, सार्वजनिक ठिकाणी मोठ्या आवाजात संगीत यंत्रणा वाजविणे, डीजे सिस्टीम वाजविणे, गाडीमधील स्पीकर, वूफर वाजविणे  व त्यामुळे ध्वनी प्रदूषण करणे,  ज्या कृतीमुळे ध्वनी, वायू व जल प्रदूषण होईल अशी कोणतीही कृती करणे, अत्यावश्यक सेवा वगळून धबधब्याच्या 1 कि.मी. परिसरात सर्व दुचाकी, चार चाकी व सहा चाकी वाहनांना प्रवेश या सर्व बाबींसाठी दि.10 जून ते दि.09 ऑगस्ट 2022 या कालावधीसाठी कर्जत प्रांताधिकारी अजित नैराळे यांनी प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत.--रायगडचा युवक

Post a Comment

Previous Post Next Post