हातकणंगले प्राथमिक शिक्षक पतसंस्थेत दीड कोटीचा अपहार

 चेअरमन, सचिव व शाखाधिकाऱ्यांसह दहा जणांविरोधात गुन्हा दाखल.

प्रेस मीडिया लाईव्ह :

हातकणंगले :  येथील हातकणंगले तालुका प्राथमिक शिक्षक सेवक पतसंस्थेत चेअरमन, सचिव आणि शाखाधिकारी यांनी १ कोटी ५८ लाख ३८ हजार २४० रुपयांचा अपहार केल्याचे शासकीय लेखापरिक्षणामध्ये स्पष्ट झाले आहे. या अपहाराबद्दल शासकीय लेखापरीक्षक सुभाष देशमुख यांनी चेअरमन, सचिव आणि शाखाधिकारी यांच्यासह १० जणांच्या विरोधात हातकणंगले पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

पतसंस्थेचे तत्कालीन चेअरमन बाबासो दादा पाटील (रा. हातकणंगले ) , सचिव हिम्मतराव दत्तू पोळ-देसाई (रा. रुकडी), शाखाधिकारी धन्यकुमार धनगोंडा पाटील (रा. नेज), शाखाधिकारी बाळासो शामराव गारे (रा.नेज), अशोक श्रीपाल मुरचिटे (रा. रुई), सुरेश जिनपाल मुरचिटे (रा. रुई), भरत बापूसो उपाध्ये (रा. नेज) , विजयकुमार भगवान शिंगे (रा. नेज), ऋषिकेश हिम्मतराव पोळ (रा. रुकडी) व अभिजीत गोपाळ देसाई (रा. हातकणंगले) या दहा जणांविरोधात या अपहार प्रकरणी हातकणंगले पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. या पतसंस्थेचे १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२० या आर्थिक वर्षाचे चाचणी लेखापरिक्षण करण्याचे आदेश जिल्हा आणि तालुका उपनिबंधक यांनी शासकीय लेखापरिक्षक सुभाष दादासाहेब देशमुख यांना दिले होते. शासकीय लेखापरिक्षणामध्ये अनियमित व्यवहार, नियमबाह्य ४३ वरील लोकांनी खोट्या संस्था व खोटे ठराव, खोट्या पावत्या सह्या करून हा अपहार केला आहे. 

अपहार खालील संस्थांमध्ये जमा नाही, किर्द जमा नाही, पोकळ फिरवल्या रक्कमा व रोखीने व्यवहार हनुमान ग्रामीण पतसंस्था नेज रक्कम किर्दला जमा नाही लाख ९० हजार शखाधिकारी धन्यकुमार पाटील यांच्या सेव्हिंग खातेवर जमा १९ लाख २३ हजार ६००. सोनाली पतसंस्था हातकणंगले नावे १ लाख ५० हजार, नेज पश्चिम भाग पाणी पुरवठा नावे २१ लाख ६२ हजार, हनुमान पतसंस्था नेज जमा नाही ११ लाख २५ हजार, व्यंकटेश्वरा वाहनधारक संस्था नावे ५ लाख, लक्ष्मी पतसंस्था रुई नावे ११ लाख, कोजिमाशी नावे २ लाख, व्यंकटेश्वरा वाहनधारक संस्था किर्द जमा नाही २२ लाख, कर्ज खात्यावर वैयक्तिक अनधिकृत खर्च ८७ हजार ६४० रु. अशा प्रकारे वरील संस्थांच्याकडे रक्कमा जमा केल्या नसल्याने बनावट दस्तऐवज तयार करुन १ कोटी ५८ लाख ३८ हजार २४० रुपयांचा अपहार केल्याचा ठपका शासकीय लेखापरिक्षकांनी ठेवला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post